वेध माझा ऑनलाइन। माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे एकेकाळचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शाडो मुख्यमंत्री म्हणूनही ज्यांना महाराष्ट्र ओळखत होता ते माजी आमदार आनंदराव पाटील लवकरच भाजपवासी होणार असल्याची आता पुन्हा चर्चा सुरू आहे नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कराड दौरा झाला त्यावेळी आनंदराव पाटील आणि बावनकुळे यांच्या झालेल्या भेटी दरम्यान याबाबत चर्चाही झाली आहे असे समजते
काही महिन्यांपूर्वी माजी आमदार आनंदराव पाटील त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना पत्रकार परिषद घेऊन आपण लवकरच पत्रकारांना एक वेगळी बातमी देऊ असे आश्वासन त्यांनी स्वतः दिले होते... त्याचवेळी ते भाजप मध्ये जाणार अशी चर्चा होती... त्यानंतर हा विषय तिथेच थांबला...पुढे बरेच दिवस हा विषय चर्चेत आलाच नाही... मात्र काल बुधवारी बावनकुळे कराडात आले असता... त्यांचा काल रात्री मलकापूर येथील कृष्णा च्या कॅम्पसमध्ये मुक्काम होता...आज सकाळी आनंदराव नाना त्यांची भेट घेण्याकरिता आले होते... त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित पत्रकारांनी... तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एक बातमी देणार होता... त्याच पुढं काय झालं? अशी विचारणा केली असता... ते म्हणाले...हो...हो त्याचीच चर्चा आज झाली...लवकरच तूमच्या मनात आहे ते होईल...त्यांच्या या बोलण्याला कराड दक्षिण चे भाजप चे नेते... डॉ अतुल भोसले यांनी देखील आपला दुजोरा दिला...यावेळी बावनकुळे यांच्याबरोबर आनंदराव नानांची नेमकी काय चर्चा झाली... हे जरी समजू शकले नसले...तरी...भाजप प्रवेशाबाबत पत्रकारांनी बातम्या छापल्याचा यापूर्वीचा संदर्भ देत विचारले असता... आनंदराव पाटील यांनी, तुमच्या मनात आहे ते लवकरच होईल असे सांगत आपला लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सूचित केले ? अशी पत्रकारांच्यात त्यावेळी चर्चा झाली... त्यामुळे माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांचे एकेकाळचे जवळचे मानले जाणारे माजी आ आनंदराव पाटील आजच्या घडीला त्यांचे राजकिय विरोधक असणाऱ्या डॉ अतुल भोसले यांचे निकटवर्तीय आहेत...त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षा सर्वानाच आहे... त्यांचे निष्ठावंत मानले जाणारे अनेकजण भाजप मध्ये यापूर्वीच प्रवेशकर्ते झाले आहेत... त्यामुळे आता चर्चा आहे ती आनंदरावनाना यांच्या प्रवेशाची...लवकरच तुमच्या मनात आहे ते होईल...असे म्हणत पत्रकारांशी बोलताना आज आनंदराव पाटील यांनी स्वतःच या विषयी दुजोरा दिला असल्याने त्यांच्या अधिकृत प्रवेशाची दाट शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे...पाहूया पुढे काय होते ते...
No comments:
Post a Comment