Thursday, October 5, 2023

राज्य सरकारने अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षक कायदा व मुस्लिम समाजास ऍट्रॉसिटी सारख्या कायद्याचे संरक्षण द्यावे ; ,उपोषणकर्ते जावेद नायकवडी, नवाज सुतार, आनंदराव लादे यांची मागणी ; एका उपोषणकर्त्याची तब्बेत अचानक खालावली ; तात्काळ रुग्णालयात हलवले;

वेध माझा ऑनलाइन। अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून समतापर्व संयोजन समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षक कायदा व मुस्लिम समाजास ऍट्रॉसिटी सारख्या कायद्याचे संरक्षण द्यावे, अशी मागणी उपोषणकर्ते जावेद नायकवडी, नवाज सुतार, आनंदराव लादे यांनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे.

यावेळी जावेद नायकवडी म्हणाले की, आम्ही कराड येथे अल्पसंख्याक मुस्लिम संरक्षक कायदा व मुस्लिम समाजास ऍट्रॉसिटी सारख्या कायद्यचे संरक्षण मिळावे या मागणीसाठी ३ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे आमच्या असलेल्या प्रमुख मागण्या  शासनाने तत्काळ मंजूर करून द्याव्यात. जोपर्यंत मागण्या मजूर करून दिल्या जात नाहीत. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.यावेळी आनंदराव लादे व नवाज सुतार यांनी देखील आपल्या मागण्यांसंदर्भात व आतापर्यंत ज्या विविध सामाजिक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे त्याविषयीची यावेळी माहिती दिली. 

दरम्यान आज दुपारच्या सुमारास एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. त्याला अचानक उलट्या होऊ लागल्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. यावेळी घडलेल्या प्रकारानंतर उपोषणस्थळी एकाच धावपळ उडाली यावेळी उपोषणकर्त्यांकडून बराचवेळ फोन करून देखील याठिकाणी कराडच्या कॉटेज हॉस्पिटलमधील कोणीही डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाला नाही अम्ब्युलन्स देखील त्याठिकाणी उशिरा पोचली दरम्यान प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्त्याला रिक्षेने रुग्णालयात हलवण्यात आले

No comments:

Post a Comment