Thursday, June 13, 2024

पुण्यात एकाच दिवशी घडल्या 5 बलात्काराच्या घटना ; पुणे हादरलं ;

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हे वाढत चालले आहेत. त्यामुळे शहरातील तरुणी आणि महिला यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे. सध्या पुण्यातून आणखी धकादायक माहिती समोर आली आहे.

शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पुण्यात एकाच दिवशी बलात्काराच्या 5 घटना घडल्या आहेत.
लग्नाचं आमिष, सोशल मीडियावरील ओळख, अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी देत या 5 बलात्काराचा घटना घडल्या आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन, लोणिकंद पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनूसार पहिल्या घटनेत कोल्हपूरच्या 34 वर्षीय महिलेला लग्नाचं अमिष दाखून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला. दुसऱ्या घटनेत 22 वर्षीय तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला.तिसऱ्या घटनेत विवाहित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तर चौथ्या घटनेत सोशल मीडियावर ओळख करत अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवून नातेवाईकांच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पाचव्या घटनेत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला गोव्याला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

No comments:

Post a Comment