Saturday, July 20, 2024

धर्मवीर 2 ; विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडाची कथा येणार पडद्यावर ; राजकारण रंगणार !

वेध माझा ऑनलाइन
कोणाची तरी आघाडी करुन तुम्ही विकला तो भगवा रंग…वीस वर्षांपूर्वी या ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्यास सावध करुन गेला…असे धर्मवीर 2 चित्रपटामधील ट्रेलरचे संवाद राज्यातील विधानसभेतील राजकारणाची दिशा ठरवणार आहे. या चित्रपटाच्या संवादावरुन एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे गूढ चित्रपटातून उलघडणार असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट फक्त मराठी भाषेपर्यंतच नाही तर हिंदीत येत असल्याने देशभरात राजकीय वादळ निर्माण होणार आहे. हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत.

धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग मुंबईत झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत हजार होते. बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते चित्रपटाचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी चांगली राजकीय फटकेबाजी झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शिंदे साहेबांसारखा नेता घडवला आणि हजारो अनुयायी घडवणारे आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे साहेब काम करत आहेत. महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे आणि बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील.

No comments:

Post a Comment