केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन प्रकरणात खेडकर दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
एवढेच नव्हे तर, पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीवरही बंदी घातली आहे. त्यामुळे पुजा खेडकरसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या 2009 ते 2023 या काळातील सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई केली आहे.पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.
No comments:
Post a Comment