वेध माझा ऑनलाइन।
भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा सादर केला आहे. या जाहीरमान्यात भाजपाने मतदारांना मोठी आश्वासनं दिली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश करण्यात येईल.
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. १२,००० वरून रु. १५,०००, तसेच एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल.
प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.
वृद्ध पेंशन धारकांना महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० देण्यात येतील जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल.
महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील उतार-चढावांपासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील.
येणाऱ्या काळात २५ लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु. १०,००० विद्यावेतन देण्यात येईल.
राज्यातील ग्रामीण भागात ४५,००० गावांत पांधण रस्ते बांधण्यात येतील.
अंगणवाडी आणि आशा सेविकांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महिन्याला रु१५,००० वेतन आणि विमा संरक्षण देण्यात येईल.
वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल.
सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत' व्हिजन महाराष्ट्र @ २०२९० सादर करण्यात येईल.
सन २०२८ पर्यंत महाराष्ट्राला $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविण्याचं लक्ष्य ठेवले आहे.
महाराष्ट्राला तंत्रज्ञान, उत्पादन आणि नावीन्यपूर्ण संकल्पना क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी खालील पावलं उचलण्यात येतील
'मेक इन महाराष्ट्र' धोरण राबवून, महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करण्यात येईल. महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता राजधानी बनविण्यात येईल. त्यासाठी जागतिक फिनटेक कंपन्यांना आकर्षित करणारं वातावरण निर्माण करण्यात येईल आणि आर्थिक तंत्रज्ञानातील नवीन संकल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल. सोबतच AI संशोधन, नवकल्पना आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल.
नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादन हब म्हणून विकसित करण्यात येईल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण उपक्रमांद्वारे प्रयत्न करण्यात येतील
आणखी बरेच काही...
No comments:
Post a Comment