वेध माझा ऑनलाइन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का असा सवाल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना केला...यावर आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही असं म्हटलं.
आमदार रोहित पवार यांनी अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यांचं मानधन दिलं नसल्याचं म्हटलं. याशिवाय नमो शेतकरी कृषी सन्मान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळी ठेवावी. याशिवाय 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी करणार का याचं पॉइंटेड उत्तर द्या, असं रोहित पवार म्हणाले. तुम्हाला कृषी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या माहीत असतानाही तुम्ही त्यांना निवडणूक काळात पैसे दिले मात्र आता त्यांना देत नाही याचा अर्थ निवडणूक साठी त्याचा वापर केला का, असा सवाल रोहित पवार यांनी केला.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना इन्सेटिव्ह देण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरु आहे, असं म्हटलं. नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय पाहिला तर त्यात नमूद केलं आहे की 1500 पेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही . त्यामुळे त्यांना वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून देत आहे. जो आकडा कमी झाला तो विभागाने दिला नाही. तर मिडीयाने हा आकडा आणला आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.
No comments:
Post a Comment