लोकांना गृहीत धरून आपल्यापुरते काम करायचे ही काँग्रेसची नीती आहे जी समाजाला घातक आहे त्यामुळे भाजप शिवाय राज्यात आणि देशात पर्याय नाही लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे देशाचा अभिमान पंतप्रधान मोदी आहेत असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज व्यक्त केलं
यावेळी काँग्रेसने छत्रपतींना जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढं महत्व दिले नाही....भाजपने मात्र छत्रपतींना योग्य ते महत्व देत गडकिल्याच्या संवर्धनासाठी महत्वाची तरतूद करून सन्मान केला असल्याचेही ते यावेळी म्हणाले...
आज विंग (ता; कराड) जि प गटातील काँग्रेस कार्यकरत्यानी आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
ते पुढे म्हणाले आमदार नसताना अतुल भोसले यांनी कराड दक्षिणेसाठी साडेसातशे कोटी एवढा निधी आणला त्यामुळे मागील पराभवानंतर देखील ते सतत कामात राहिले आणि म्हणून कार्यसाम्राट आमदार म्हणून कराड दक्षिण ने त्यांना 40 हजार मतांनी निवडून दिले आता थांबू नका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अतुल बाबांच्या बरोबर राहून कराड दक्षिण मध्ये
सर्वच ठिकाणी भाजपमय वातावरण तयार करा माथाडी कामगारांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले
अतुलबाबा देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार ...
अतुलबाबा देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार आहेत त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मला अतुलबाबा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रण देताच मी लग्गेच हो म्हटलो...कारण 25 वर्षे आमदार असून आताच राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे...त्यात मी जर अतुलबाबा यांचे हे आमंत्रण नाकारलं असत...तर माझा 6 महिन्यात कार्यक्रम लागला असता...त्यामुळे मी लग्गेच हो म्हटलो...असे म्हणताच सभेच्या ठिकाणी एकच हशा पिकला...
सातारा जिल्हा भाजप चा बालेकिल्ला...
सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता हा भूतकाळ झाला...मात्र अतुल भोसले यांच्यासह उदयनराजे असतील मनोज घोरपडे असतील जयकुमार गोरे असतील मी स्वतः असेन...आम्ही सर्वांनी मिळून भाजपमय वातावरण केलं आहे त्यासाठी लोकांनी व सर्व कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आहे हे विसरून चालणार नाही...त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपमय
वातावरण तयार झाले असल्याचेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment