घोगाव येथील संत कृपा इंजिनिअरिंग कॉलेज व श्री निनाई देवी विद्यालय यांच्यावतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात कॉलेजचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपल्याला भविष्यात सांभाळेल. कारण आज आपण सर्वत्र प्रदूषणाचे विविध दुष्परिणाम पाहत आहोत. सुनामी, भूकंप, महापूर, ढगफुटी सारखे अनेक नैसर्गिक आपत्तींना आपणास तोंड द्यावे लागत आहे याचे प्रमुख कारण होणारी वृक्षतोड आहे.
सर्वांनी वृक्ष लागवड करावी, झाडे जतन करावी म्हणजे निसर्ग आपल्याला सोबत करेल.
यावेळी कल्याण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. व आभार मानले
याप्रसंगी गणेश पवार, लालासो पाटील, आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, जयवंत काटेकर, विठ्ठल काटेकर, संत कृपा कॉलेजचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री निनाई देवी विद्यालय येथे नूकतेच वनविभाग सातारा व वनपरिक्षेत्र कराड यांच्या वतीने बिबट्या वन्यप्राणी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
याप्रसंगी वनपाल डी बी कांबळे वनरक्षक संतोष पाटील , वनरक्षक चिवटे साहेब, वनसेवक. हनुमंत कोळी इत्यादी उपस्थित होते.
मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले.
ज्येष्ठ शिक्षक आनंदराव जानुगडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वनपाल कांबळे साहेब यांनी या प्राण्यापासून कशी काळजी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
वैभव जाधव यांनी आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment