Wednesday, September 17, 2025

आता मनोज जरांगे पाटील यांचा चलो दिल्लीचा नारा : मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार :

वेध माझा ऑनलाईन।
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला, त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठ यश आलं आहे, त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाज गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे. हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे, राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे.

याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे.  धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

No comments:

Post a Comment