Wednesday, December 31, 2025

उद्या 1 जानेवारीला नूतन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव कराड पालिकेत सकाळी 11 वाजता आपला पदभार स्वीकारणार ;

वेध माझा ऑनलाइन।
उद्या नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1  जानेवारी चे औचित्य साधून यशवन्त विकास आघाडी चे अध्यक्ष व नूतन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आपला नगराध्यक्ष पदाचा पदभार सकाळी 11 वाजता स्वीकारणार आहेत अशी माहिती त्यांच्या शहर कार्यालयाकडून देण्यात आली आहे

राजेंद्रसिंह यादव यांनी नुकतीच झालेली नगराध्यक्ष पदासाठीची कराड शहराची निवडणूक लढवली होती त्यात त्यांनी 9735 एवढे मतांधिक्य मिळवत विजय मिळवला
दरम्यान या निवडणुकीत एकूण 9 जण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभे होते 
राजेंद्रसिंह यादव यांनी या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर करत त्यासाठीची तयारीही त्यांनी अनेक दिवसापासून केली होती स्वतः जनसंपर्कावर भर देत त्यांनी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीच्या सहकार्याने शहरातून 
चांगलेच मताधिक्य मिळवले व ही निवडणूक जिंकली 
उद्या ते नगराध्यक्ष म्हणून आपला पदभार स्वीकारणार आहेत 

दरम्यान या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत लोकशाही आघाडीचे 13 नगरसेवक यशवन्त विकास आघाडी चे 7 तर भाजप चे 10 नगरसेवक निवडून आले आहेत शहरात 1 जण अपक्ष उमेदवार म्हणून देखील निवडून आला आहे 

Tuesday, December 30, 2025

लोकशाही आघाडीचे स्वीकृत नगरसेवक जयंतकाका पाटीलच होणार !

वेध माझा ऑनलाइन।
कराड पालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता कोणत्या पार्टीचे कोण स्वीकृत नगरसेवक पालिकेत एन्ट्री करणार याच्या चर्चा सुरू आहेत  लोकशाही आघाडीकडून जयंतकाका पाटील स्वीकृत म्हणून पालिकेत एन्ट्री करतील अशी चर्चा सुरू आहे त्याचबरोबर सौरभ पाटील व  लोकशाही आघाडीचे जेष्ठ नेते सुभाषराव पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत...दरम्यान नेहमी पार्टीसाठी पडद्यामागे सूत्रे सांभाळत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जयंतकाकाना यावेळी स्वीकृत म्हणून संधी मिळणार असल्याचे खात्रीलायक समजते
तरी याविषयीचा अंतिम निर्णय लोकशाही आघाडीचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील हेच घेणार आहेत 

लोकशाही पार्टीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांचे नाव यावेळी लोकशाही आघाडीकडून स्वीकृतसाठी चर्चेत आहे त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने केलेले आतापर्यंतचे काम खूप मोठे आहे यावेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी घेतलेले  परिश्रम व 6 नगरसेवकावरून 13 वर ही नगरसेवक संख्या जाण्यासाठी केलेले प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत अशी चर्चा आहे यशवन्त आघाडी व लोकशाही आघाडी यांचे एकत्रीकरण करण्यामागे त्यांचे यशस्वी प्रयत्न कारणीभूत असल्याचेही सांगण्यात येत आहे जयंतकाका पाटील यांच्या नावाची कराड पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे

सौरभ पाटील हे लोकशाही आघाडीचे युवा नेते म्हणून परिचित आहेत संयमी आणि अभ्यासू म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे मागील निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून येऊन नगरसेवक संख्या कमी असताना देखील अडचणीच्या काळात सताधाऱ्यांपुढे त्यांनी मांडलेले शहरातील विषय व त्यातून गाजवलेल्या पालिकेच्या सभा आजही चर्चेत असतात बहुमत नसतानाही लोकांसाठी कामे करून घेण्याचे कसब दाखवत त्यांनी आपली राजकीय परिपकवता त्यावेळी दाखवली आहे त्यांच्या त्यावेळच्या कामाच्या पद्धतीनेच गटनेता म्हणून त्यांनी आपली छाप सोडण्यात यश मिळवले आहे त्यांचीही यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागेल अशी चर्चा आहे

शहरातील लोकशाही गटाचे नेते सुभाषराव पाटील यांचाही पालिकेच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे त्यांचीही अभ्यासू राजकारणी म्हणून ओळख आहे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे शहरातील विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय नेहमीच जनतेत चर्चेचे राहिले आहेत त्यांचीही स्वीकृतसाठी शहरात चर्चा आहे  

दरम्यान शहरात विविध चर्चा सुरू असल्या तरी याविषयीचा अंतिम निर्णय लोकशाही आघाडीचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील हेच घेणार आहेत 
दरम्यान नेहमी पार्टीसाठी पडद्यामागे सूत्रे सांभाळत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जयंतकाकाना यावेळी स्वीकृत म्हणून संधी मिळणार असल्याचे खात्रीलायक समजते

Monday, December 29, 2025

कराडच्या उपनगराध्यक्षपदासाठी पोपटराव साळुंखे यांच्या नावाची जोरदार चर्चा ; लोकशाही आघाडी कडून लवकरच होणार शिक्कामोर्तब!

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या उपनगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार? या चर्चा सध्या सुरू आहेत लोकशाही आघाडीचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले नगरसेवक पोपटराव साळुंखे यांच्या नावासाठी सध्या शहरातून जोरदार मागणी होत आहे आणि त्यांचेच नाव या पदासाठी सर्वात पुढे आहे अशी चर्चा असल्याने तेच उपनगराध्यक्ष होतील असे खात्रीलायक सांगितले जात आहे...पोपटराव साळुंखे हे गेली 30 वर्षे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वत्र परिचित आहेत...अडचणीच्या काळात त्यांच्याबरोबर कोण असेल... तर ते नाव म्हणजे पोपटराव साळुंखे... असेच नेहमी म्हटले जाते...

पोपटराव साळुंखे यांनी कायमच माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना कोणत्याही अपेक्षेशिवाय साथ दिली आहे... भले, भले अनेकजण आम्ही निष्ठावन्त आहोत असे म्हणत दुसऱ्या पार्टीच्या नेत्याच्या जवळ जाताना दिसतात...मात्र पोपटराव साळुंखे यांनी असल्या राजकारणाला कधीही महत्व दिले नाही... त्यामुळे पर्यायाने त्यांचा आदर नेहमीच सगळीकडेच राखला गेला...निष्ठावन्त असावा तर असा...असे त्यांचे नाव घेऊन आजही बोलले जाते...

पोपटराव साळुंखे हे युवकांचे आयडॉल मानले जातात त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे युवकांचे आशास्थान म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते प्रत्येक सामाजिक कामात त्यांचे नेहमी मोठे योगदान दिसते
राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत खासदार निलेश लंके यांच्याशी असणार्या त्यांच्या मैत्रीची राज्यात चर्चा असते  कराड शहरासह राज्यभरातील अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचा परिचय आहे

मागील 2016 च्या पालिका निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला मात्र त्यातून खचून न जाता अक्षरशः दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी आपले सामाजिक कार्य चालूच ठेवले बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन तरुणांची साथ व मोठ्यांचे आशीर्वाद त्यांना नेहमीच मिळाले आणि याच जोरावर त्यांनी यावेळी झालेल्या निवडणुकीत भरघोस यश मिळवत आपली सिद्धता सिद्ध केली त्यांनी कराडच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात मोठे यश मिळवले आहे

कराडचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव येत्या नवीन वर्षात 1 जानेवारीला
नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील...त्याचवेळी लोकशाही आघाडी च्या वतीने कराडचे उपनगराध्यक्ष म्हणून पोपटराव साळुंखे यांचे नाव माजी आमदार बाळासाहेब पाटील जाहीर करतील अशीही चर्चा आहे...

Friday, December 26, 2025

कराडात लोकशाही आघाडीकडून जयंतकाका पाटील यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागणार ! सौरभ पाटील ,सुभाषराव पाटील, जयंत बेडेकर यांच्याही नावाची चर्चा ; याबाबतचा अंतिम निर्णय माजी आमदार बाळासाहेब पाटील घेणार ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड पालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता कोणत्या पार्टीचे कोण स्वीकृत नगरसेवक पालिकेत एन्ट्री करणार याच्या चर्चा सुरू आहेत  लोकशाही आघाडीकडून जयंतकाका पाटील स्वीकृत म्हणून पालिकेत एन्ट्री करतील अशी चर्चा सुरू आहे त्याचबरोबर सौरभ पाटील यांचेही नाव अग्रक्रमाने चर्चेत आहे लोकशाही आघाडीचे जेष्ठ नेते सुभाषराव पाटील आणि पार्टीचे निष्ठावन्त कार्यकर्ते जयंत बेडेकर यांचीही नावे चर्चेत आहेत...मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पार्टीचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील हेच घेणार असल्याने नेमकी कोणाची वर्णी लागणार याची मोठी चर्चा आहे 

लोकशाही पार्टीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांचे नाव यावेळी लोकशाही आघाडीकडून स्वीकृतसाठी चर्चेत आहे त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने केलेले आतापर्यंतचे काम खूप मोठे आहे यावेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी घेतलेले  परिश्रम व 6 नगरसेवकावरून 13 वर ही नगरसेवक संख्या जाण्यासाठी केलेले प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत अशी चर्चा आहे यशवन्त आघाडी व लोकशाही आघाडी यांचे एकत्रीकरण करण्यामागे त्यांचे यशस्वी प्रयत्न कारणीभूत असल्याचेही सांगण्यात येत आहे जयंतकाका पाटील यांच्या नावाची कराड पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे

सौरभ पाटील हे लोकशाही आघाडीचे युवा नेते म्हणून परिचित आहेत संयमी आणि अभ्यासू म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे मागील निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून येऊन नगरसेवक संख्या कमी असताना देखील अडचणीच्या काळात सताधाऱ्यांपुढे त्यांनी मांडलेले शहरातील विषय व त्यातून गाजवलेल्या पालिकेच्या सभा आजही चर्चेत असतात बहुमत नसतानाही लोकांसाठी कामे करून घेण्याचे कसब दाखवत त्यांनी आपली राजकीय परिपकवता त्यावेळी दाखवली आहे त्यांच्या त्यावेळच्या कामाच्या पद्धतीनेच गटनेता म्हणून त्यांनी आपली छाप सोडण्यात यश मिळवले आहे ...त्यांचीही यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागेल अशी चर्चा आहे

शहरातील लोकशाही गटाचे नेते सुभाषराव पाटील यांचाही पालिकेच्या राजकारणाचा मोठा अनुभव आहे त्यांचीही अभ्यासू राजकारणी म्हणून ओळख आहे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे शहरातील विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय नेहमीच जनतेत चर्चेचे राहिले आहेत त्यांचीही स्वीकृतसाठी शहरात चर्चा आहे

माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक जयंत बेडेकर यांचेही नाव स्वीकृत म्हणून चर्चेत आहे 24x7 सामाजिक कार्य करण्यासह पार्टीसाठी प्रामाणिक व चोख काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची शहर व परिसरात ओळख आहे त्यांचीदेखील स्वीकृतसाठी चर्चा आहे 

दरम्यान याविषयीचा अंतिम निर्णय लोकशाही आघाडीचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील हेच घेणार आहेत त्यामुळे स्वीकृतसाठी कोणाची वर्णी लागते हे यानिमित्ताने पहायचे आहे

कराडला २० व्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

वेध माझा ऑनलाईन।
वीस वर्षांपूर्वी स्वर्गीय विलासराव पाटील (काका) यांनी कराडसह सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली. शेतकऱ्यांना दरवर्षी काहीतरी नवीन देण्याची ही परंपरा आजही कायम असून या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांनी काढले.

कराड कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद व महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विसावे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन ना. शंभूराजे देसाई यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खा. नितीनकाका पाटील, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, आमदार नरेंद्र पाटील, कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, राष्ट्रवादी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, कार्यकारिणी सदस्य विजयसिंह यादव, युवा नेते आदिराज पाटील–उंडाळकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. शंभूराजे देसाई पुढे म्हणाले, देश व राज्य कृषीप्रधान असून शेतकरी बळकट झाला तरच अर्थव्यवस्था मजबूत होईल. यंदाच्या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे. आज ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असल्याने या तंत्रज्ञानाचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

खा. नितीनकाका पाटील म्हणाले, सातारा व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने स्वर्गीय विलास काकांनी दूरदृष्टीने या प्रदर्शनाची सुरुवात केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती हेच या प्रदर्शनाचे यश आहे. यावर्षी एआय तंत्रज्ञानावर दिलेला भर कौतुकास्पद आहे. सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून बारामती कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेतीतील बदल व आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावे, यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे. यंदा एआय तंत्रज्ञानावर दिलेला भर शेतकऱ्यांसाठी निश्चितच लाभदायक ठरेल.

प्रारंभी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सभापती सतीश इंगवले यांनी प्रास्ताविक केले तर उपसभापती नितीन ढापरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास बाजार समितीचे सर्व संचालक, प्रभारी सचिव आबासो पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


---

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा विशेष सत्कार

कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा निवडीबद्दल पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी खा. नितीनकाका पाटील, आ. नरेंद्र पाटील, अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर उपस्थित होते.
तसेच कराडचे नवनिर्वाचित नगरसेवक विजयसिंह यादव व मलकापूर पालिकेचे  नगरसेवकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


---
यशवंत बँकेतील घोटाळा ... 

नोटा घरात अन ईडी दारात; चरेगावकरांची चांगलीच "फाटली'...

शेखर चरेगावकर' यांना नागपूरातून घेतले ईडीने ताब्यात...



यशवंत सहकारी बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याची कथा म्हणजे स्वार्थी हेतूने केलेली फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि गैरव्यवहार यातून हे सार अफाट, अलबेल आणि धक्कादायक कटकारस्थान हळूहळू जिल्ह्याच्या डोळ्यावर येवू लागले आहे. त्यामध्ये बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक यांच्यासह अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट कर्ज वाटप, बनावट स्वाक्षऱ्या यांची जणू जंत्रीच जमवल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट होत आहे. हजारो ठेवीदार, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि छोटे व्यावसायिक, त्यांचे कष्टार्जित पैसे गमावून बसले असून ते या घोटाळ्याने पुरतेच हवालदिल झाले आहेत. त्यामुळे एकेकाळच्या या नावलौकीक पात्र 'यशवंत बँके'त सहकारातील घोटाळ्याचे 'शिखर'च पार केले असल्याचे स्पष्ट होत आहे.

आता जिल्हा व जिल्ह्याबाहेर मालमत्ता घेतलेल्याचे दस्तऐवज व नोटा घरात पडू लागल्यामुळे या कारवाईसाठी मंगळच जणू मागे लागत मंगळवारी थेट ईडी दारात आली, त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणाला आणखी वेगळी कलाटणी मिळाली असून त्यामुळे संंशयितांची चांगलीच तंतरली आहे.

फलटणच्या यशवंत सहकारी बँकेवर मंगळवार, दि. २३ रोजी पहाटेच्या सुमारास कराड, सातारा, फलटण कार्यालयासह संशयितांच्या निवाससस्थानाची झाडाझडती अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडीच्या) पथकाने केली. प्रथम कराड येथील विंगमधील त्यांच्या फार्महाऊसवर तसेच सोमवार पेठेसह गजानन हौसिंग सोसायटी आणि विंग परिसरात छापे टाकले. दरम्यान, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांना नागपूर येथून त्यांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांचे बंधू शार्दुल उर्फ सुरेश चरेगावकर, शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी रा. पुणे आणि बँक अधिकारी संशयित वैशाली विजय पावसे, केशव गजानन कुलकर्णी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आले आहे.

माणसाने स्वार्थी असावं पण मर्यादित राहून पण जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा त्याच 'शिखर' होते. यशवंत बँकेत घोटाळ्याचे शिखर चढतानाचा सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांचा राजकारणात येण्यापूर्वीच्या प्रवासानेच याला बळ दिल्याचे आज विविध पैलूतून स्पष्ट होवू लागले आहे. कराड तालुक्यातील उंडाळेनजिकचे साळशिरंबे हे आटपाट नगर अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव. येथील मूळचे हे चरेगावकर यांचे कुटुंब आहे. वडील सुरेश चरेगावकर हे नोकरीनिमित्त कराड येथे राहिले. येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सैदापूर विकास सोसायटीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाहाची सांगड घालता यावी म्हणून सचिव म्हणून काम करु लागले. या दरम्यान, शेखर, शार्दुल उर्फ मुकुंद आणि शैनाक उर्फ विठ्ठल यांचे संगोपनासह शालेय शिक्षण होवू लागले. यामध्ये शिक्षण पूर्ण होत असताना शौनक उर्फ विठ्ठल हे शेखर चरेगावकर यांच्या पुणे येथील आत्याकडे दत्तक म्हणुन गेले. अन शौनक उर्फ विठ्ठल चरेगावकर हे नाव  विठ्ठल गोविंद  कुलकर्णी असे झाले. एव्हाना शेखर चरेगावकर यांचेही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते शालेय विद्यार्थ्यांचे क्लास घेवू लागले. आता एवढ्यावरच न थांबता त्यांनी सहकारातील पदवी जीडीसीॲण्ड ए घेतल्यामुळे या सहकारात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी त्यांचेही क्लास घेवून कुटुंबाला मदत करु लागले.
त्यानंतरही कुटुंबातील आर्थिक ताळेबंद चालवताना कसरत होवू लागल्यामुळे ते सुरुवातील विविध संस्थांचे पिग्मी एजंट म्हणुन काम करत पुढे पार्श्वनाथ पतसंस्थेत काम करु लागले. त्यानंतर पुढे जनकल्याण पतसंस्थेत काम करु लागले. या संस्थेने पुढे फलटण येथील यशवंत बँक चालवण्यास घेतली. त्याचवेळी शेखर चरेगावकर यांनी प्रतिष्ठा अन अर्थकारणाच शिखर म्हणुन या जनकल्याण पतसंस्थेत ते संचालक झाले. आता ही जनकल्याण पतसंस्थेत इतर मोठे व्यवहार करताना मर्यादा पडू लागल्या.  शेखर चरेगावकर व त्यांच्यासह अन्य दोघां तिघांनी फलटण येथील यशवंत बँक चालवण्यास घेतली. त्यापूर्वी या बँकेची आर्थिक स्थिती पाहून त्यामधून स्वहित कसं जपता येईल, याचाही ताळमेळ त्यांनी लावला होता. यानंतर यशवंत बँकेचा कारभार हाती घेतल्यानंतर विश्वासाचे नात्याचे एक एक टप्पे पार केले. 

यशवंत बँकेच्या माध्यमातुन कराड परिसरातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य म्हणुन कर्ज देवू लागले. हळूहळू या बँकेवर त्यांचाही विश्वास दृढ होवू लागला. कालांतराने सर्वच अधिकार हातात आल्यामुळे कर्जमागणीच्या अर्जावर बनावट सही करुन संपूर्ण सेट कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मंजूर होवू लागले. आता सुरुवातीचे काही प्रकरणे कर्ज मंजूर होवू लागले. अन त्यामधील ही सर्व रक्कमच हातात आली. यामुळे त्याचा विनीयोग कसा कुठे करायचा, याची जंत्री सुरु झाली. काही बनावट कंपन्याही स्थापन करुन त्याचेही कर्ज मंजूर केली गेली. या कर्जाना सहकार नियमानुसार पुरेसे तारणही घेतले गेले नाही. अत्यंत घाईघाईने कर्जाचे वाटपही केले गेले. त्याच्या रककमा कर्जदारांच्या कर्ज खात्यावरुन त्यांच्या बनावट कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्या. ऑडीट रिपॉर्टमध्ये त्या बाबी अनियमतीतता दर्शवूनही यंत्रणांनी हे सहकार परिषदेचे त्यावेळचे अध्यक्ष असल्यामुळे साहाजिकच पांघरुन घालून टाकले. 

या कर्ज प्रकरणाच्या रक्कमेतून पुढे दापोली तालुक्यातील बुरुंडी येथे जमीन खरेदी केली. त्यासह इंदापूर, करमाळा, खेड, शिवापूर, भिगवण, विंग आणि कराडशहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे अनेकदा आरोपही यापूर्वी त्यांच्यावर झाले आहेत. त्याचप्रमाणे १९५ बोगस कर्ज त्यावेळी झाल्यानंतर याबाबत रिझर्व्ह बँकेने प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणीही झाली होती. एकूणच चरेगावकर बंधूच्या कटकारस्थानाच्या या घटनांना आज ईडीच्या कारवाईने उजाळा मिळाला जात आहे. 

शेखर चरेगावकर यांचे कुटुंब सुरुवातीला कराड येथील कोयना वसाहत येथे त्यानंतर विंग येथील डोंगराच्या पायथ्याजवळ श्रीकृष्ण व्हॅली वसाहतमधील एका बंगलो टाईपच्या घरात वास्तव्यास आहेत. याशिवाय सोमवारपेठसह अनेक ठिकाणी स्थावर, जंगम मालमत्ता करुन ठेवल्याची माहिती ईडीपर्यंत पोहोचली आहे. शेखर चरेगावकर हे बँकेची कारवाई लागण्यापूर्वी सातारा जिल्हाच नव्हे तर राज्यभरातील अनेक बँकांना ते मार्गदर्शन करत होते. त्यांचे बंधू मुकुंद चरेगावकर यांनी कन्स्ट्रक्शनचा व्यवसायासह गौण खनिज आणि खासगी फायनान्स यामधून लाखोंची माया जमवली असल्याची माहिती पुढे येत आहे. याशिवाय कराड येथील नवीन सर्किट हाउसची मॅनेजमेंटही तेच पाहत असतात. या सर्व बाबी विचारात करता चरेगावकर या बंधूचे कटकारस्थाने कारनामे जिल्हाभर चर्चेचा विषय ठरल्यानंतर ईडीने कारवाई केल्यानंतर या सर्व घटनांना पुष्टी मिळू लागली आहे.

..................................

*सीबीआय चौकशीसाठी सात महिन्यापूर्वी केली मागणी*

गेल्या सहा सात महिन्यापूर्वी तर खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. त्या भेटीत यशवंत सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत थेट सीबीआयचीच चौकशी करण्यात आली होती. मात्र, ती या ना त्या कारणाने सतत पुढे गेली. आज मात्र, ईडीच्या कारवाईने या सर्वच बाबी उघड झाल्या असून त्यावरही चर्चेच्या फैरी गावागावातून होवू लागल्या आहेत. 

...................................

*बँकेत असा झाला घोटाळा..?*

यशवंत बँकेचे संचालक शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर, विठ्ठल कुलकर्णी आणि तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर या बंधूनी बनावट कंपन्या स्थापन केल्या. त्याद्वारे १२५ कोटी रुपयांची बेनामी कर्ज प्रकरणे मंजूर झाली. या कर्जांना कोणतेही पुरेसे तारण घेतले गेले नव्हते. कोणत्याही सहकाराचे नियमांचे पालनही केले नव्हते. घाईघाईने त्या काळात कर्ज वाटपही करण्यात आले होते. त्या रकमा कर्जदाराच्या कर्ज खात्यावरुन त्यांच्या बनावट कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्या. ऑडीट रिर्पार्टमध्ये ही एवढं होवूनही ग्रीन सिग्नल दिला गेला. आज मात्र, या सर्व पैलूची खुमासदार चर्चा होत आहे. 

...................................

*अपहाराच्या जंत्रीनंतर ईडीची कारवाई*

यशवंत सहकारी बँकेत ११२ कोटी १0 लाख ५७ हजार ४८१ रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात भाजपचे सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि शेखर चरेगावकर यांच्या नातेवाईकांसह ५0 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याबाबत सातारा आर्थिक गुन्हे शाखेने यामधील अपहाराची जंत्रीच पुढे दिल्याने ईडीने ही कारवाई केली आहे. 

..............................

*पिग्मी एजंट ते सहकार परिषद अध्यक्ष प्रवास चक्रावणारा*

यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील शेखर चरेगावकर यांचा प्रवास हा साध्या लुनावरुन सुरु झाला होता. कुटुंबाच्या अर्थकारणाचा ताळमेळ साधणारे शेखर हे सुरुवातीला याच लुनावरुन पिग्मी गोळा करणारे एजंट म्हणुन काम करु लागले. पुढे पार्श्वनाथ पतसंस्था, जनकल्याण पतसंस्था या सर्व प्रवासात त्यावेळचे सहकार परिषदेचे अध्यक्ष अशा प्रवासाचे अनेक पैलू आज मात्र ईडीच्या कारवाईने उलगडले जात आहेत. 

.........…......................

*'शेखर'चे बंधू विठ्ठल चरेगावकर यांची पोलीस कोठडीत रवानगी*

*यशवंत सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईत सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांना नागपूर येथून ईडीने मंगळवारी सकाळीच ताब्यात घेतले आहे. तर त्यांचे बंधू शैनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी रा. पुणे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, शेखर चरेगावकर यांना कराड पोलीस ठाणे येथे कधीपर्यंत आणले जाईल, असे विचारले असता. जोपर्यंत ईडी आम्हांला कळवत नाही, तोपर्यंत अटक आमच्याकडून करता येत नाही.

*-तुषार दोशी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सातारा.*

Thursday, December 25, 2025

कराड येथे आजपासून यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन ; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते उद्घाटन

वेध माझा ऑनलाइन।
कराड येथील स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट आवारात २० वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी,औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आणि जिल्हा कृषी महोत्सव शुक्रवार दि. 26 डिसेंबर पासून सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, पर्यटन व खनिकर्म मंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले व उपसभापती नितीन ढापरे यांनी दिली.
उद्घाटन सोहळ्यास मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार नितीन काका पाटील, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार सचिन पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, राज्याचे पणन संचालक संजय कदम, धैर्यशील कदम,बाळासाहेब सोळसकर,रामकृष्ण वेताळ,अविनाश मोहिते,राजेश पाटील वाठारकर यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, संस्थाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दि. 26 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रगतीशील शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन, तर सायंकाळी 4 वाजता कृषिमंत्री व मान्यवरांच्या शुभहस्ते मुख्य उद्घाटन होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ऊस पीक स्पर्धा व प्रदर्शन तसेच नाविन्यपूर्ण कृषी अवजारे निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शनिवार दि. 27 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता केळी घड प्रदर्शन व स्पर्धा, तर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत “उत्सव कृषी सौभाग्यवतींचा – खेळ पैठणीचा” हा सुप्रसिद्ध कलाकार वासू पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत फुले प्रदर्शन व स्पर्धा, गाय–म्हैस–बैल प्रदर्शन व स्पर्धा होणार आहे.
सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी फळे प्रदर्शन व स्पर्धा तसेच श्वान (डॉग) प्रदर्शन व स्पर्धा होणार आहेत.
मंगळवार दि. 30 डिसेंबर रोजी भाजीपाला पीक, शेळी–मेंढी व पक्षी प्रदर्शन व स्पर्धा होणार असून सायंकाळी 4 वाजता समारोप होईल. यावेळी स्पर्धा बक्षीस वितरण व शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी शिरसागर तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे यंदा २० वे वर्ष असून या प्रदर्शनाची ख्याती राज्यभर पसरली आहे. राज्यातील मोजक्या दर्जेदार कृषी प्रदर्शनांमध्ये याची गणना होते.
या प्रदर्शनाचे आयोजक शेती उत्पन्न बाजार समिती कराड, कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा व महाराष्ट्र शासनाचा आत्मा विभाग असून विविध शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शनातून शेतकऱ्यांना व उद्योजकांना सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक असलेले अद्ययावत ज्ञान मिळणार आहे. कृषी व औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढविणे हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश आहे. यावर्षी सुमारे 400 स्टॉल्स या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
पिलरलेस डोम पद्धतीचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून त्यामध्ये स्वतंत्र पशु–पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन तसेच नवीन तंत्रज्ञानयुक्त स्टॉल्स यांचा समावेश असेल. डायनॅमिक इव्हेंटचे मॅनेजर धीरज  तिवारी व सचिन पाटील यांनी प्रदर्शनाच्या स्टॉलची उभारणी पूर्ण झाल्याची माहिती दिली.सदर कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकरी बांधव,नागरिक यांनी घ्यावा असे आवाहन शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Wednesday, December 24, 2025

यशवन्त बँक गैरव्यवहार प्रकरण ; शेखर चरेगावकर यांचे बंधू शौनक चरेगावकरला अटक ! ; 29 डिसेंम्बरपर्यंत पोलीस कोठडी ! ;

वेध माझा ऑनलाइन।
यशवन्त बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सातारा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू आहे याप्रकरणी या विभागाकडून राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे बंधू शौनक चरेगावकर याना नुकतेच ताब्यात घेतले आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 डीसेम्बर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती मिळाली आहे

दरम्यान यशवन्त बँकेच्या 112 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नुकतेच कराड व फलटणच्या शाखेत छापा टाकून चौकशी केली होती या तपासात काही महत्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्याचे समजते काहींना याविषयी नोटिसा बजावण्यात आल्या असून या लोकांना चौकशीसाठी हजर राहण्यास संगीतल्याचेही समजते

Tuesday, December 23, 2025

ईडी अधिकाऱ्यांची यशवन्त बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी कारवाई ! ;


वेध माझा ऑनलाईन 

 काल सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने धडक कारवाई करत यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयात छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या भावालाही पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे

मिळालेल्या  माहितीनुसार, 

मुकुंद चरेगावकर यांच्या कराड येथील निवासस्थानी ईडीच्या पथक मंगळवारी पहाटे छापा टाकला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन यशवंत बँकेच्या कराड शाखेत आणलं. 112 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर ईडीच्या अन्य दोन पथकांनी फलटण येथील बँकेची मुख्य शाखा आणि साताऱ्यातील शाखेवर देखील छापे टाकले. तिन्ही ठिकाणी सकाळपासून झाडाझडती सुरू होती. यशवंत बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं यापूर्वीच उघडकीस आलं आहे. तसंच भाजपा नेते, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील लेखापरीक्षण आणि 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 दरम्यानच्या लेखापरीक्षण पूर्व कालावधीत जे संचालक कार्यरत होते. त्यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवला आहे.

दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी काल प्रथम बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या कराडच्या निवासस्थानी कारवाई सुरू केली. त्यानंतर ईडी पथकाने थेट यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे मोर्चा वळवला. सकाळी बँकेचे कार्यालय सुरू होताच बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली.कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक नोंदी, कर्ज प्रकरणांशी संबंधित फाईल्स व डिजिटल रेकॉर्डची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाले असून, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील लेखापरीक्षण तसेच १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या लेखापरीक्षणपूर्व कालावधीत कार्यरत असलेल्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.या प्रकरणी पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी परस्पर संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले.११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा कथित अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे.

बोगस कर्जप्रकरणे व बनावट कागदपत्रांचा वापर फिर्यादीत नमूद केल्यानुसार,बोगस कर्ज प्रकरणे उभी करण्यात आली,खोटी व बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली,तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वाटप करण्यात आले,जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडण्यात आली,
निधीचा उद्देशबाह्य वापर करून तो तृतीय पक्षांकडे वळवण्यात आला,तसेच दस्तऐवजांत फेरफार व खोट्या नोंदी करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करण्यात आला, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणात यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, ३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी, २ व्यवस्थापक व अन्य ९ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.


Monday, December 22, 2025

वेध माझा ऑनलाइन।
कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या पवित्र स्मृतींना १०१ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, श्री. विनायक भोसले, सुदन मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी खनिज कर्म महामंडळाचे संचालक भरत पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. अशोक गुजर, जयंत पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव थोरात, जयवंतदादा जगताप, प्रांतिधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे, कृष्णा विश्व विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, श्रीरंग देसाई, धोंडिराम जाधव, शिवाजी पाटील, बाबासो शिंदे, निवासराव थोरात, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, अविनाश खरात, दत्तात्रय देसाई, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, पैलवान आनंदराव मोहिते, मलकापूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनावले, नवनिर्वाचित नगरसेवक मनोहर शिंदे, हणमंतराव जाधव, सूरज शेवाळे, राजश्री जगताप, गीता साठे, अश्विनी शिंगाडे, सुनीता पोळ, रंजना पाचुंदकर, कल्पना रैनाक, शरद पवार, धनंजय येडगे, प्रमोद शिंदे, डॉ. स्वाती थोरात, माजी नगरसेवक राजेंद्र यादव, दिनेश रैनाक, शहाजी पाटील, राहुल यादव, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, कराडचे नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजी पवार, गणेश पवार, वर्षा वास्के, माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र माने, महादेव पवार, सुहास जगताप, स्मिता हुलवान, अरुण जाधव, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, अमित चव्हाण, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, मंडल अध्यक्ष सुषमा लोखंडे, प्रवीण साळुंखे, शंकर निकम, कराडचे माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, जखिणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, रेठरे बुद्रुकचे सरपंच हणमंत सूर्यवंशी, कोयना वसाहतीच्या सरपंच सुवर्णा वळीव, सवादेचे सरपंच संजय शेवाळे, सैदापूरचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव, माजी जि. प. सदस्या सौ. शामबाला घोडके, माजी पं. स. सदस्य बाळासाहेब निकम, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन चंद्रकांत कापसे, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, कृष्णा बँकेचे संचालक प्रकाश पाटील, नारायण शिंगाडे, हेमंत पाटील, वसीम मुल्ला, विलास पवार, आर. टी. स्वामी, मनोज शिंदे, माजी जि. प. सदस्य डॉ. राजकुमार पवार, प्रमोद पाटील, हेमंत धर्मे, अरविंद पाटील, एम. के. कापूरकर, उमेश शिंदे, गजेंद्र पाटील, रामभाऊ सातपुते, राहुल पाटील, उमेश मोहिते, ॲड. दिपक थोरात, सुनील कणसे, सुहास कदम, डॉ. सुशील सावंत, पोपटराव शेवाळे, भाऊसाहेब ढेबे, नीळकंठ शेडगे, सुरेश पाटील, हर्षवर्धन मोहिते, संजय पवार, शशिकांत साळुंखे, संतोष हिंगसे, सचिन पवार, मुकुंद महाराज, गणेश डुबल, बबलू मोहिते, योगेश पाटील, दिलीप पाटील, वीरेंद्र गुजर, रमेश मोहिते, विनायक घेवदे, अक्षय सुर्वे, मनोज पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्व. जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 


Sunday, December 21, 2025

कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव...9735 चे भरगोस मताधिक्य...आणि कराडात एकच जल्लोष...यादव म्हणाले... कराडकरांचे मनापासून आभार ...

वेध माझा ऑनलाइन।
जनतेने हातात घेतलेली निवडणूक मी नक्कीच मोठ्या मताधिक्याने जिंकणार याचा विश्वास होता...आणि जिंकलो...कराडकरांचे मनापासून आभार...असे म्हणत कराडचे नवे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली...
दरम्यान ही निवडणूक यादव यांनी 9735 एवढ्या मताधिक्याने जिंकली आहे...

यादव म्हणाले 
स्व यशवन्तराव चव्हाण पी डी पाटील साहेब यांच्या विकसनशील ध्येयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोन्ही आघाड्या या निवडणुकीला सामोरे गेलो ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती जनतेला शांततामय सहजीवन हवे आहे विकास हवा आहे आम्ही दोन्ही आघाड्या मिळून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत 

दरम्यान ही निवडणूक जाहीर झाल्यापासून राजेंद्रसिह यादव यांनी आपली उमेदवारी जाहिर करत आपला लोकसंपर्क शहरात सातत्याने ठेवला होता शिवसेना पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या नगराध्यक्ष होण्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब केले होते त्यातच त्यांना शहरातील लोकशाही आघाडीची साथ मिळाली आणि त्यांची अध्यक्षपदासाठीची निवडणूक अधिकच सहज झाली
आज ते शहराचे नवे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत याबद्दल त्यांनी समस्त कराडकरांचे आभार मानले आहेत... 

Tuesday, December 16, 2025

सुप्रिया सुळे अमित शाह यांच्या भेटीला थेट दिल्लीत दाखल ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
नुकतीच दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. काल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या इतर खासदारांसोबत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही अमित शहांची भेट घेतली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी महानगर पालिकेतील जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शहा यांनी राज्यात जिथे शक्य असेल तिथे युती करा अशा सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांनी युती करण्यास अमित शहा यांना हरकत नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Sunday, December 14, 2025

शरद पवारांना "भारतरत्न' देण्याच्या मागणीवर गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली : म्हणाले... हा काय एखाद्या मंडळाचा पुरस्कार आहे का ?

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना हा सर्वोच्च सन्मान मिळावा, अशी निलेश लंके यांनी भूमिका व्यक्त करत आग्रही मागणी केली. 

दरम्यान, यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांना माध्यम प्रतिनिधींनी सवाल केला असताना त्यांनी हसत त्यावर प्रतिक्रिया दिली. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या मागणीची खिल्ली उडवत या मागणीवर त्यांनी “भारतरत्न हा काय एखाद्या मंडळाचा पुरस्कार आहे का?” अशा शब्दात टीका करत या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस देशाचा PM होणार? पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा ; बालिश विधान, या वर्षाचा सर्वात मोठा विनोद” असे म्हणत भाजपची चव्हाण यांच्यावर टीका ;

वेध माझा ऑनलाइन।
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक राजकीय दावा केला आहे, त्यानुसार येत्या १९ डिसेंबरनंतर देशात एक मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते. अमेरिकेतील एबस्टिन फाईल्स सार्वजनिक झाल्यानंतर हे शक्य होईल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. या फाईल्समध्ये काही भारतीय नेत्यांची नावे असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चव्हाणांच्या वक्तव्यावर टीका करत त्याला “बालिश विधान” आणि “या वर्षाचा सर्वात मोठा विनोद” असे संबोधले आहे. तर, महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी चव्हाण यांच्या दाव्यात काहीतरी तथ्य असण्याची शक्यता व्यक्त केली आहे, कारण ते एक अनुभवी नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. १९ डिसेंबरला एबस्टिन फाईल्समध्ये नेमके काय समोर येते आणि त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? संजय शिरसाट काय म्हणाले ?

वेध माझा ऑनलाइन।
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विविध भेटीगाठींवर भाष्य केले. शिंदे यांनी संघाच्या कार्यालयास आणि दीक्षाभूमीला दिलेल्या भेटी या सामाजिक सलोखा राखण्याच्या पक्षाच्या भूमिकेचा भाग असून, त्या नव्या नाहीत असे शिरसाट यांनी सांगितले.दरम्यान उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील मुख्यमंत्रीपदाविषयी प्रकाश आंबेडकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या राजकीय भाकितांना शिरसाट यांनी फेटाळले. 

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या जागावाटपाबद्दल बोलताना, अंतर्गत सर्व्हेनुसार शिवसेना १३५ जागांवर लढू शकते असे त्यांनी नमूद केले. शिवसेना आणि भाजपमध्ये समाधानकारक जागावाटप वरिष्ठ नेते, म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील मुख्यमंत्रीपदाविषयी प्रकाश आंबेडकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या राजकीय भाकितांना शिरसाट यांनी फेटाळले. अशा गोष्टी राजकारणात घडत नसतात आणि वरिष्ठ पातळीवरील निर्णय जाहीरपणे चर्चिले जात नाहीत असे ते म्हणाले. 

तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतेच विधानसभेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत खुलासा केला. ही योजना केवळ प्रशिक्षणासाठी होती, रोजगारासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत 1 लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून, 804 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. पूर्वी सहा महिन्यांची असलेली ही योजना नवीन सरकारच्या नेतृत्वात 11 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली होती.आता या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी नवीन मुख्यमंत्री स्व रोजगार योजना 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे. या योजनेत पहिल्या वर्षात 5 लाख तरुणांना 6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 6 टक्के व्याजाने दिले जाईल, ज्यातील 3 टक्के व्याज सरकार भरणार आहे. याशिवाय, प्रत्येक आयटीआयमध्ये इनोव्हेशन सेंटर्स आणि मेंटरशिप ग्रुप्स स्थापन केले जातील. तसेच, विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन देण्यासाठी एम.एस.एस.आय. पुणे संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. हे नवीन उपक्रम तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील

Saturday, December 13, 2025

कराड परिसरातील रखडलेल्या सहापदरीकरणाच्या कामाबाबत विधानसभेत आमदार डॉ अतुल भोसले यांनी लक्षवेधी मांडत शासनाचे वेधले लक्ष ;

वेध माझा ऑनलाइन।
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील कराड परिसरातील रखडलेल्या सहापदरीकरणाच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडत शासनाचे लक्ष वेधले.

आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले की, पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र कराड येथील पंकज हॉटेलपासून नांदलापूरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या अर्धवट अवस्थेतील पुलामुळे आतापर्यंत १०० हून अधिक अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये सुमारे ५४ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे हा महामार्ग अक्षरशः अपघातांचा सापळा ठरत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

या महामार्गावर अलीकडेच घडलेल्या एका गंभीर अपघाताचा उल्लेख करताना आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले की, पिंपळगाव येथील एका कॉलेजची बस सहलीसाठी कणकवलीला गेली होती. परतीच्या प्रवासात कराड तालुक्यातील वाठार गावाजवळ या बसचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कृष्णा हॉस्पिटलची संपूर्ण वैद्यकीय टीम तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. बसमध्ये ४० विद्यार्थी होते. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले, तर त्यातील २ विद्यार्थ्यांची प्रकृती अतिगंभीर होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र महामार्गावरील असुरक्षिततेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले, असे त्यांनी नमूद केले.

आमदार डॉ. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना थेट प्रश्न विचारला की, या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची नेमकी डेडलाईन काय आहे? यापूर्वी सभागृहात ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही पुलाचे काम अपूर्ण आहे. पुलाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात साईटवर कामगार नाहीत, प्रोजेक्ट इन्चार्ज उपलब्ध नाही आणि सर्विस रोडच्या दुरुस्तीचे काम कधी होणार, याची कोणतीही निश्चित वेळमर्यादा नाही. सर्विस रोडच्या खराब अवस्थेमुळेही मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या आणि वारंवार सूचना देऊनही दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) मार्फत काय कारवाई होणार, याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली जाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, सातारा–कागल या राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुरू असून, सध्या ते प्रगतीपथावर आहे. काही ठेकेदारांकडून दिरंगाई झाली असल्याचे मान्य करत, या संदर्भात केंद्र सरकारशी आधीच पत्रव्यवहार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नुकतीच दिल्ली येथे ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून, या महामार्गावरील काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारांना १५ दिवसांचा अंतिम कालावधी देण्यात आला असून, या कालावधीत समाधानकारक प्रगती न झाल्यास कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. बस चालकाच्या माहितीनुसार कुत्रा आडवा आल्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी महामार्गावरील सुरक्षेच्या सर्व बाबी पुन्हा एकदा तपासण्याचे निर्देश नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

कराड येथील मोठ्या उड्डाणपुलाचे काम सध्या ८३ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी सभागृहात दिले.

गुलाम, गांडूळ असे बोलून आपली ऊर्जा वाया घालवू नका ; मंत्री शंभूराजे देसाई यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “गुलाम” किंवा “गांडूळ” असे संबोधून आपली ऊर्जा वाया घालवू नका, असे प्रत्युत्तर देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित हा पक्ष असून, आम्ही कृतीतून दाखवून देतो, असेही देसाई म्हणाले. देसाईंनी उद्धव ठाकरे यांच्या मालक-नोकर मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, २०२२ आणि २०२४ च्या निवडणुकांमधील परिस्थितीची आठवण करून दिली. मुख्यमंत्री म्हणून संवैधानिक पदावर काम केलेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदाची घटनात्मकता आता का नाकारली, असा सवाल देसाईंनी केला. त्यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री पद स्वीकारले असताना, आता त्याला विरोध करणे हे लहान मुलांच्या भांडणासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीतील नेतेपदाच्या चर्चेवर महायुती एकत्रितपणे निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायचं, मंत्री शंभूराजे देसाई यांचा संताप;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान शिंदे सेना या उल्लेखावरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला. मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात या उल्लेखावर तीव्र आक्षेप घेतला. “आम्ही शिवसेना आहोत, शिंदे सेना नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी निवडणूक आयोगाने अधिकृतपणे शिवसेना हे नाव दिल्याचे नमूद केले. निवडणूक आयोगाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला दिल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यामुळे इतर कोणत्याही नावाने उल्लेख करू नये, अशी त्यांची मागणी होती.

यावर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका पत्रकार परिषदेत चार वेळा शिंदे सेना असा उल्लेख केला होता. त्यांनाही सांगावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनीही आपल्या पक्षाला अजित दादा गट असे न संबोधण्याची विनंती केली. या घटनाक्रमातून महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांच्या अधिकृत नावांचा वापर आणि त्यावरुन निर्माण होणारे मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया, आता प्रकृती कशी आहे ? वाचा बातमी

वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 28 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी भुजबळ यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सांगण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर नुकतेच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर भुजबळ यांची प्रकृती कशी आहे, असे विचारले जात होते. असे असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांची भेट घेतली आहे. भुजबळ यांचा शस्त्रक्रियेनंतर एक फोटो समोर आला आहे.
बाळा नांदगांवकर यांनी आज (13 डिसेंबर) छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याच भेटीचा एक फोटो त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया खात्यावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये छगन भुजबळ दिसत असून बाळा नांदगांवकर त्यांच्याची संवाद साधत आहेत. भुजबळ यांच्या हातावर सलाईनची सुई लावलेली दिसत आहे. बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. 

उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका ; ठाकरे म्हणाले... गांडूळाने फणा काढायचा नसतो ;

वेध माझा ऑनलाइन।
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. नाव न घेता “गुलामानं प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांन फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो,” असे म्हणत त्यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. या टीकेला शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “गुलाम आणि गांडूळ ही प्रतिक्रिया ज्यांनी दिली, त्यांनाच ती लागू होते. गुलामाने 2022 मध्ये काय चमत्कार केला, हे आपण पाहिले आहे. तसेच, जर गांडूळ असता तर 2024 ची महायुतीची सत्ता परत आली नसती,” असे गोगावले म्हणाले. “शिंदे साहेबांचा आणि देवेंद्रजींचा नाद कोणी करू नये,” असा इशाराही त्यांनी दिला.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. नार्वेकर यांच्यासोबत त्यांची अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ठाकरेंनी राम शिंदे यांचीही भेट घेतली. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता मिळावा, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. जर विरोधी पक्षनेते पद दिले जात नसेल, तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. संख्याबळाचा नियम पाळायचा असेल, तर उपमुख्यमंत्री पदाला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे त्यांनी म्हटलं.

शरद पवारांना भारतरत्न द्या ; खासदार निलेश लंके यांची मागणी ; सदावर्ते अन् पडळकरांनी उडवली खिल्ली

वेध माझा ऑनलाइन ;शरद पवारांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. ही मागणी केवळ कार्यकर्ते म्हणून नव्हे, तर राज्यातील शेतकरी आणि बेरोजगारांची असल्याचे लंके यांनी म्हटले आहे. या मागणीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणे पवारांवर टीका केली. तर सदावर्ते यांनी या मागणीची खिल्ली उडवत, गिनीज बुकमध्ये नाव नोंदवण्याची मागणी करतील असे म्हटले. 

भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या हातात असतो. मागणी करणे हा लोकशाहीतला अधिकार असला तरी, अंतिम निर्णय सरकारचा असतो. आतापर्यंत ५३ व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यात महाराष्ट्रातील नऊ व्यक्तींचा समावेश आहे.

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर अजितदादांनी ठेवला ठपका ; हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक

वेध  माझा ऑनलाइन
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी विधानसभेत पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहारावरून आक्रमक भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये या प्रकरणासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. अजित पवारांच्या मते, अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून चुकीच्या बाबी समोर आल्यास तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते, ज्यामुळे पुढील प्रकार घडला नसता. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी व्यवहार रोखला असता, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे असे सूचित केले की, या प्रकरणात केवळ काही अधिकारी दोषी आहेत आणि मोठ्या व्यक्तींना त्यात जबाबदार धरले जात नाही.

दरम्यान, अमिडीया कंपनीने सरकारी जमिनीची खरेदी करून कायदा धाब्यावर बसवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात १% भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी, ९९% शेअर असलेले पार्थ पवार अद्याप आरोपी नाहीत. महसूल विभागाच्या विकास खारगे समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली ! ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
मुंबई आणि महाराष्ट्रात बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींच्या आकडेवारीने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो च्या आकडेवारीनुसार, 2021 ते 2024 या काळात मुंबईत बेपत्ता मुला-मुलींचे प्रमाण जवळपास 30 टक्क्यांनी वाढले आहे. या वाढीव संख्येत मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. या गंभीर स्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकार नेमके काय करत आहे, असा सवाल केला आहे.
राज ठाकरेंनी आपल्या पत्रात आंतरराज्य टोळ्यांचा उल्लेख केला आहे. या टोळ्या लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपतात किंवा भीक मागण्यासाठी वापरतात, असे त्यांचे म्हणणे आहे. रेल्वे स्थानकांवर किंवा बस स्थानकांवर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे खरे आई-वडील असतात का, याचा तपास करून गरज पडल्यास डीएनए चाचणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. लहान मुले, तरुण मुली आणि जमिनीही पळवल्या जात असल्याचा आरोप करत, यावर विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज...

वेध माझा ऑनलाइन- ई-पीक पाहणी’ ची ऑनलाईन मुदत संपल्याने हजारो शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झा ली होती. आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने आता ‘ऑफलाईन’ पीक पाहणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी राहून गेली आहे, त्यांना आता १५ जानेवारीपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.
​आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ई-पीक पाहणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक शेतकरी तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे नोंदणी करू शकलेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.  ई-पीक पाहणीची नोंद सातबाऱ्यावर असल्याशिवाय ‘नाफेड’ किंवा शासकीय केंद्रांवर शेतमाल खरेदी केला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.