वेध माझा ऑनलाइन।
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 28 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी भुजबळ यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सांगण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर नुकतेच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर भुजबळ यांची प्रकृती कशी आहे, असे विचारले जात होते. असे असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांची भेट घेतली आहे. भुजबळ यांचा शस्त्रक्रियेनंतर एक फोटो समोर आला आहे.
बाळा नांदगांवकर यांनी आज (13 डिसेंबर) छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याच भेटीचा एक फोटो त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया खात्यावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये छगन भुजबळ दिसत असून बाळा नांदगांवकर त्यांच्याची संवाद साधत आहेत. भुजबळ यांच्या हातावर सलाईनची सुई लावलेली दिसत आहे. बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.
No comments:
Post a Comment