कराड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा बनलेला प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडले आहे. या प्रभागाच्या विकासासाठी त्यामुळे माजी नगरसेवक शहाजीराव डुबल यांच्या सुनबाई सौ. देवयानी दिग्विजय डुबल यांना उमेदवारी मिळावी अशी वाढती मागणी होऊ लागली आहे. मतदारांचा विचार करता सौ देवयानी डुबल यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे. सौ. देवयानी डुबल या व्यावसायिक व समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेणारे दिग्विजय डुबल यांच्या पत्नी व माजी नगरसेवक शहाजीराव डुबल यांच्या सून आहेत. सौ. देवयानी यांना राजकीय वारसा असून समाजसेवा करण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे. 1985 ते 1991 दरम्यान त्यांचे सासरे शहाजीराव डुबल हे कराड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. तेव्हापासून डुबल घराणे हे लोकांच्या नेहमीच जनसंपर्कात कायम असते. त्यामुळे त्यांना लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे.
सौ. देवयानी डुबल उच्चशिक्षित असून घराचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्यास समर्थ आहेत व त्यांचे पती दिग्विजय यांचा कायम समाजकार्यात पुढाकार असतो. या पार्श्वभूमीवर कराड शहरातील जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना समाजसेवा करण्यासाठी आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांचे सासरे शहाजीराव डुबल यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केले असल्याने साहजिकच त्यांना राजकीय वारसा असल्यामुळे व स्वतःचा जनसंपर्क खूप मोठा असल्याने त्या निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या प्रभागातील मतदार ही सौ देवयानी डुबल यांनी ही निवडणूक लढवावी अशी अपेक्षा बाळगून आहेत. कोणत्याही जाती-पातीचे राजकारण न करता गोरगरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता माझे सासरे व माजी नगरसेवक शहाजीराव डुबल हे कायम सर्वांच्या मदतीला धावून जात होते. तोच आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या मुलांनी त्यांचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवला आहे. त्या माध्यमातून आपण स्वतः राजकीय व समाजसेवेचा हा वारसा या पुढे चालू ठेवू असे सौ. देवयानी दिग्विजय डुबल यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment