Tuesday, February 25, 2020

रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी डॉ. अतुलबाबांकडून आर्थिक मदत...

कराड
स्वराज्या साठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या वंशजांना मदत करण्याकरिता समाज्यातील प्रत्येक घटक पुढे आला पाहिजे.ते आपणा सर्वांचे कर्तव्यच आहे असे प्रतिपादन कराड दक्षिण चे भाजप नेते अतुलबाबा भोसले यांनी केले.नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी शेतकरी प्रसारक मंडळाकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत डॉ. शितलताई मालुसरे यांच्याकडे अतुलबाबा यांचेकडून  सुपूर्द करण्यात आली त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना अतुलबाबा म्हणाले, डॉ शीतल मोरे यांच्या पाठीशी त्यांचा एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहणार आहोत.छत्रपतींचे विचार, कार्य नव्या पिढीसमोर यावे व त्यातून चांगला समाज घडण्यासाठी मदत व्हावी, या पिढीला त्यांचे विचार समजावेत यासाठी म्हणून शिवमहोत्सव आयोजित करण्यात आला होता.या पुढे हा महोत्सव व्यापक स्वरूपात साजरा होईल अशी ग्वाही ही भोसले यांनी यावेळी दिली.

डॉ. शितलताई मालुसरे यावेळी म्हणाल्या, स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या वंशजांना अतुलबाबा भोसले यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली आहे त्यामुळे आपण या ऋणातच राहणे पसंत करू.

 यावेळी,शेतकरी प्रसारक मंडळाचे प्रमुख सल्लागार प्रा. विनोद बाबर,इतिहास अभ्यासक प्रा अरुण घोडके,शिवकालीन शस्त्र संग्रहक गिरिश् राव जाधव,डॉ.बी एस साळुंखे, एस ए माशाळकर, डॉ.उदयसिंह सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 जुळेवाडी तालुका कराड येथील जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट याठिकाणी  छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सदर शिवमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

No comments:

Post a Comment