Wednesday, February 26, 2020

कराड नगराध्यक्षांच्या पालिकेतील केबिनला कुलूप घातले प्रकरणी "प्रहार' च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल......

कराड
येथील नगराध्यक्षांच्या पालिकेतील केबिनला कुलूप घालणाऱ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेत नगराध्यक्षा हजर नसल्याच्या कारणावरून सदर संघटनेने त्यांच्या केबिनला कुलूप घालून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे,या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला.प्रहार संघटना यापुढचे काय पाऊल उचलते हे आता पहायचे आहे.

प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येथील नगराध्यक्षांना भेटून त्यांना शहरातील काही समस्यांबाबतचे निवेदन देण्याकरता मंगळवार दि.25 रोजी पालिकेत आले असता नगराध्यक्षा पालिकेतच हजर नव्हत्या.त्या पक्षाच्या कामाकरिता बाहेर गेल्या असल्याच या संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजले.त्यानंतर त्यांनी त्यांच्या पालिकेतील केबिनला कुलूप घातलं व नगराध्यक्षांना लोकांची कामे करायची नसतील तर त्यांनी राजीनामा देउन घरी बसावं व पक्षच काम खुशाल करावं असा पवित्रही घेतला होता.त्यानंतर पालिकेच्या वतीने या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांवर येथील पोलीस ठाण्यात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल,तसेच आणि इतरही काही कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे आता,यापुढचे पाऊल प्रहार  संघटना काय उचलणार हे आता पहायचे आहे.


No comments:

Post a Comment