कराड(अजिंक्य गोवेकर यांजकडून)
सध्याच्या राज्यातील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या महाविकास आघाडीच्या विरोधात येत्या 25 तारखेला मंगळवारी म्हणजे आज सातारा जिल्ह्यातील भाजप या सरकारचा निषेध करत धरणे आंदोलन करणार आहे.या सरकारने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार या बाबत हे सरकार कुचकामी ठरत आहे असा आरोप करत या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली व याविषयी विस्तृत माहिती दिली.यावेळी उपस्थित असलेले डॉ, अतुल भोसले खूप वेळ शांत होते...मात्र या आंदोलनाबाबत माहिती देऊन झाल्यावर येथील इतर प्रश्नांवर पत्रकार या नेत्यांशी चर्चा करू लागले त्यावेळी मागील झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्याना भरपाई अद्याप मिळाली नाही.त्यावेळी तुमचेच सरकार होते असा सवाल पत्रकारांनी पावसकर व अतुलबाबाना विचारला असता,पावसकरनी, घाटावरील रहिवासी असलेल्या पूरग्रस्तांना, व कुंभार समाज्यातील लोकांना ही मदत पोचल्याच सांगितल.त्यावेळी पाटण कॉलनीतील पूरग्रस्तांना काहीच मदत का दिली गेली नाही...असा सवाल केला असता...मधेच डॉ. अतुलबाबा म्हणाले...त्या ठिकाणी जे पुढारी राहतात त्यांनाच हा प्रश्न विचारा... ते सत्तेत आहेत...आता हे त्याना विचारा...असे ते बोलताच त्या ठिकाणी एकच हशा पिकला... या त्यांच्या दिलेल्या उत्तरातून अतुलबाबाना त्यांचा थोडक्या मतात झालेला पराभव अद्याप सलतोय असच जाणवलं...नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून कराड दक्षिण मधून आ.पृथ्वीराज बाबा यांच्या विरोधात किरकोळ मतांच्या फरकाने अतुलबाबा पराभूत झाले.शहरातील प्रमुख ताकदी त्यांच्या बरोबर होत्या.जबरदस्त फाईट त्यांनी पृथ्वीराज बाबांना दिली.पण,थोडक्यात ते पराभूत झाले.त्या नंतर काही दिवस ते out off

होते. नंतर ते कराड जवळील गोटे येथील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदतीला पुढे आलेले मतदार संघाने झालेल्या निवडणुकीनंतर पाहिले.आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने ते यावेळी आले असता, जिल्हाध्यक्षांनि आंदोलनाबाबत माहिती देऊन झाल्यावर इतर प्रश्नावर उपस्थित पत्रकार या भाजप नेत्यांशी बोलू लागले त्यावेळी पाटण कॉलनीतील रहिवासीना गेल्या पावसाळ्यात झालेल्या नुकसानाची भरपाई पूरग्रस्त म्हणून मिळाली नाही याबाबत विचारणा केली असता अतुलबाबानी अक्षरशः पोटतिडकीने आपले म्हणणे मांडले व निवडून आलेल्याना ह्याचा जाब विचारा असे ते म्हणाले.त्यांनी अशा त्यावेळच्या सडेतोड व पोटतिडकीने केलेल्या या वक्तव्यावरून त्यांना त्यांच्या झालेल्या पराभवाची सल आजही तेवढीच जाणवते आहे हे मात्र या निमित्ताने आवर्जून लक्षात आले...
खरतर,अनेकांचे झालेले विजय गाजतात मात्र अतुल बाबांचा पराभव अनेक चर्चानि गाजला होता.त्यामुळे खरे सेलिब्रेटी निवडणुकीनंतर अतुलबाबाच ठरले. ते निवडून येणार म्हणून लागलेल्या सर्वाधिक जिल्ह्यातील पैजा त्यांची लोकप्रियता अधोरेखित करणाऱ्या ठरल्या. त्यांच्याच बाजूला तालुक्याचे अनेक नेते,नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते यांचा ओढा का होता ? यावरून देखील त्यांच्या वाढत्या ताकदीची चर्चा त्यावेळी झाली. पराभूत होऊनही त्यांची निवडणुकीतून प्रचंड वाढलेली मते हीदेखील त्यांना लोकप्रियता मिळवून देणारी चर्चा ठरली. राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेले युवा नेतृत्व म्हणून संपूर्ण दक्षिण मतदार संघ त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत होता.त्यांनी पंढरपूर देवस्थान येथे केलेला विकास राज्यात चर्चेचा ठरला.येथील पालिकेत त्यांचा शब्द कराड शहाराच्या विकासात त्यांचं नेतृत्व फुलवत चालला होता. त्याचवेळी झालेल्या निवडणुकीदरम्यान जाहीर सभांमधून त्यांच्यावर कळत, न कळत झालेली राजकीय शाळा त्यांच्या पराभवाच कारण लोकांना वाटू लागली, अनेक राजकारण्यांनी आपली निष्क्रियता लपवण्यासाठी या चर्चेचे भांडवलदेखील केले.याचीही जोरदार चर्चा झाली...
एकूणच... अतुलबाबा निवडून येणार असा अंदाज काही मिडियानेही वर्तवला, मात्र तस झालं नाही......तरी अतुलबाबा अनेक चर्चानी गाजले... आणि जणू सेलिब्रेटी ठरले...
याच आपल्या वाढत्या लोकप्रियतेची कल्पना त्यांनाही असावी ...म्हणूनच कदाचित त्यांना या झालेल्या पत्रकारपरिषदेदरम्यान आपल्या पराभवाची सल जाणवली असावी...
आणि ती त्यांच्या बोलण्यातून दिसलीदेखील...यानिमित्ताने ते
आता पुन्हा नव्याने चर्चेत आले आहेत...
आणि ती त्यांच्या बोलण्यातून दिसलीदेखील...यानिमित्ताने ते
आता पुन्हा नव्याने चर्चेत आले आहेत...
No comments:
Post a Comment