Friday, May 1, 2020

कराड येथे 2 तर सातारा येथे 1 कोरोना पॉझिटिव्ह

सातारा दि. 1 ( जि. मा. का )
सातारा जिल्ह्यात कराड कृष्णा मेडिकल कॉलेज येथे  बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 2 महिला (वय वर्षे 16 व 37) व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे  मुबंईवरून 17 एप्रिल रोजी आलेला तरुण( वय वर्षे 27 )  , घरात विलगीकरणामध्ये होता. सर्दी, खोकला म्हणून काल भरती झाला होता. अशा 3 नागरिकांचा कोरोना  कोविड-19   अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथील 20,  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 71, व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 3 अशा 94 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात 45 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

00

No comments:

Post a Comment