मुंबई :
3 मे नंतर आता जेवढी बंधनं त्यापेक्षा अधिक मोकळीक प्रत्येक झोननुसार देणार आहोत. पण घाईगडबड न करता ही मोकळीक दिली जाईल," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी धीराने, खंबीरपणाने, सावधपणाने आपण पावलं टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं,कराड रेड झोन मध्ये असल्यानं इथं सध्यातरी मोकळीक मिळणार नाही हेच यातून स्पष्ट झालंय.
मुंबई आणि शेजारचा परिसर, पुणे, नागपूर यासारख्या रेड झोनमध्ये काही करणं आता हिताचं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच ऑरेंज झोनमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत नाहीत, पण काही अॅक्टिव्ह केसेस आहेत ते जिल्हे वगळता, उर्वरित जिल्ह्यांमध्ये काय करु शकतो याचा विचार सुरु आहे. तर ग्रीन झोनमधल्या अटी-शर्ती हळूहळू काढत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. "रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे ज्वालामुखी जो पेटेल असा वाटत नाही," अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या झोनचे वर्णन केलं.
जाहीर रेड झोन :
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर
ऑरेंज झोन :
रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली,

No comments:
Post a Comment