Thursday, September 17, 2020

माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 3 पोर्टेबल इमर्जन्सी व्हेंटिलेटर प्रशासनाकडे सुपूर्द


कराड : कोरोना विरुद्धच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सी.एस.आर फंडातून कराड येथील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ३ पोर्टेबल इमर्जन्सी व्हेंटिलेटर कराडचे प्रातांधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. याप्रसंगी तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते. 


 

कोरोनाचा प्रादुर्भाव कराड तालुक्यात वाढतच आहे. अश्या परिस्थितीत कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन मशीन व विशेषतः व्हेंटिलेटर चा तुटवडा असल्याने कोरोना बाधित रुग्णांवर उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. अश्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेऊन कराडसाठी सी एस आर फंडातून ३ पोर्टेबल इमर्जन्सी व्हेंटिलेटर उपलब्ध केले आहेत. हे सर्व व्हेंटिलेटर कराडचे प्रांताधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. रुग्णांवर योग्यवेळी उपचार होण्यासाठी या व्हेंटिलेटरचा उपयोग होणार आहे.     


No comments:

Post a Comment