Wednesday, September 23, 2020

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून वारणा कोविड सेंटरला ६ लाख रुपयांचा निधी

कराड: कोरोनामुळे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून कराड शहर मुस्लिम समाज संचलित वारणा कोविड सेंटर करीता एक्स-रे मशीन खरेदीकरिता ६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा करताना सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक चे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, नगरसेवक फारूक पटवेकर,  इसाकभाई सवार, इरफान सय्यद, माझरभाई कागदी, माजी नगराध्यक्ष अल्ताब शिकलगार, रफिकभाई मुल्लानी, वलीशा देसाई, डॉ जब्बार देसाई, इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते.  

 

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कोरोनाच्या या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक सेवाभावी संस्था, राजकीय-सामाजिक संस्था, अनेक लोकप्रतिनिधी मानवता धर्माने सेवा करीत आहेत. याच सेवाभावनेने कराड शहरातील मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन वारणा हॉटेल येथे कोविड सेंटर सुरु केले आहे. मुस्लिम समाजाचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. 

 

No comments:

Post a Comment