कराड
सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना पहायला मिळाले. जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार, यावर बरेच दिवस खलबतं सुरु होती, अध्यक्षपदासाठी अनेकांनी फील्डिंग लावली होती, मात्र आज अध्यक्षपदाच्या निवडी दिवशी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नितीनकाका जाधव-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं दरम्यान, राष्ट्रवादीने शिवेंद्रराजेंचा पत्ता कट केल्याची यानिमित्ताने चर्चा साताऱ्यात सुरु आहे उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आली
या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, नितीनकाका पाटील, प्रभाकर घार्गे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत निर्णय घेऊन अध्यक्षपदाच्या नावावर मोहर उठवण्यात आली.
No comments:
Post a Comment