वेध माझा ऑनलाईन - आज पहिल्याच दिवशी लसीकरणाला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसला. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देशभरातील 37 लाख 84 हजार 212 मुलांनी पहिला डोस घेतलाय. जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत मुलांच्या लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहेत. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह राज्याच्या विविध भागात लसीकरण सुरु झालंय. मुंबईत जवळपास नऊ लाख मुलांना लस दिली जाणार आहे. पुण्यात चाळीस तर पिंपरी चिंचवडमध्ये आठ लसीकरण केंद्रावर मुलांचं लसीकरण होणार आहे. नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मुलांचं लसीकरण अभियान सुरु झालंय. शहरी भागासह ग्रामीण भागातही मुलांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर मुलांनी न घाबरता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
करण्यात येतंय.
No comments:
Post a Comment