Sunday, January 9, 2022

जिमला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; महाराष्ट्र सरकारने जिम सुरू ठेवायला दिली परवानगी...

वेध माझा ऑनलाइन - जिमला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र सरकारने जिम सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे काल (8 जानेवारी) सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहे.

आदेशानुसार जिम 50% क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिमला जाताना दोन्ही लसीची डोस आवश्यक असणार आहेत.
तसेच जिममध्ये काम करणारे कर्मचारी यांचे देखील लसीकरण पूर्ण झालेले असायला हवं, असं आदेशात म्हटले आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना मास्क घालणं देखील बंधनकारक असणार आहे.
ब्युटी सलून देखील चालू राहणार आहेत. यासाठी 50 टक्के क्षमतेची अट लागू करण्यात आली आहे. जे नियम हेअर कटिंगसाठी लागू असतील, तेच ब्युटी सलूनसाठी देखील लागू असणार आहेत. दोन्ही लसीचे डोस घेतलेलं आवश्यक असून मास्क वापरणं बंधनकारक आहे.

No comments:

Post a Comment