वेध माझा ऑनलाईन - भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही कारण रुग्णसंख्या वाढली तरी हॉस्पिटलाइजेशन वाढणार नाही. हॉस्पिटलाइजेशन वाढते तेव्हाच कोरोनाची लाट येते असे वक्तव्य डॉ. रवी गोडसे यांनी केले. कारण बऱ्याच जणांना जरी कोरोना किंवा ओमायक्रॉनची लागण झाली तरी त्यांना लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांनी टेस्टींग करुच नये, असा सल्ला देखील यावेळी डॉ. गोडसे यांनी दिला आहे. जर आपण लोकांना आयसोलेट करत गेलो तर एका महिन्यात पूर्ण देशच बंद पडेल असेही ते म्हणाले. तसेच भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदनही केले. त्याचबरोबर आणखी लसीकरणावर भर देण्याचा सल्ला देखील रवी गोडसे यांनी दिला आहे.
सध्याची भारतातील कोरोनाची स्थिती, वाढणारी ओमायक्रॉनची संख्या, 15 ते 18 वयोगटातील मुलांना सुरू केलेले लसीकरण याबाबत एका मराठी न्युज टी व्ही चॅनेल ने डॉ. रवी गोडसे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी लसीकरण खूप महत्वाचे असल्याचे सांगितले. ज्या लोकांनी 2 लस घेतल्या आहेत, त्यांना ओमायक्रॉनने सीरीयस होण्याचा धोका 60 टक्क्यांनी कमी असतो. तर ज्यांनी 3 डोस घेतले आहेत, त्यांना 81 टक्क्यांनी धोका कमी असतो. ओमायक्रॉने झाल्यामुळे हॉस्पीटलमध्ये पोहोचण्याची शक्यता 81 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तुम्ही रुग्णालयातच नाही गेले तर तुम्हाला काय फरक पडतो. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये जाऊन उगीच बेड्स अडवू नका असे गोडसे यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment