कराड
उद्योगिनी फाउंडेशन अंतर्गत " EMPOWERING CONCLAVE 2022" या उद्योग परिषदेचे आयोजन येथील श्रीकृष्ण व्हॅली या ठिकाणी दिनांक आठ व नऊ जानेवारी रोजी करण्यात आले होते खा श्रीनिवास पाटील व भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती
यशवंत बँकेचे चेअरमन शेखर चरेगावकर अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांचीही यावेळी उपस्थिती होती
खास व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे शिवसेना नेत्या डॉ नीलमताई गोरे याही कार्यक्रमास उपस्थित होत्या
यावेळी उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल हिंगणगाव तालुका कवठेमंकाळ येथील पयोद इंडस्ट्रीच्या सौ स्नेहल ताई लोंढे यांना उद्यम रागिणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
यावेळी सोनल भोसेकर म्हणाल्या महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम गेली 10 वर्ष सुरू असून , या ठिकाणी क्लस्टर उभी करण्याचे काम फौंडेशन करणार आहे,व त्यातून छोट्या उद्योगाना मार्केट मिळवून देण्यासाठी राज्यात उद्योगिनी शॉपी सुरू केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, यावेळी खासदार पाटील यांनीही मार्गदर्शन केले तर विजयाताईंनी निरनिराळ्या शासनाच्या योजना व पोर्टल बद्दल महिलांना माहिती दिली.व त्यासाठी फौंडेशन ला सर्व सहाय्य करण्याचे आश्वासन दिले
व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा मार्गदर्शन करताना मा डॉ निलमताई गोरे, यांनी फौंडेशन च्या कार्याचे कौतुक केले, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, तरच राष्ट्र सक्षम होऊ शकेल, या साठी आशा संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे, शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे त्या म्हणाल्या
संस्थेचे पदाधिकारी सारिका पाटील, प्रेमल शहा, छाया पवार, सायली मिरजकर, स्नेहा जोशी, मंगेश भणगे, आंबली, माहेश्वरी, सर्व चैप्टर चे पदाधिकारी या सर्वानी परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment