वेध माझा ऑनलाइन - शिवाजी पार्क वर लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे अशी इच्छा नाही अस विधान त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने केले आहे. आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाची स्थापना हीच लतादीदींना खरी श्रद्धांजली आहे, हेच दीदींचे खरे स्मारक असल्याचे पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले. दीदींच्या स्मारकावरून जो वाद सुरू आहे. तो राजकारण्यांनी थांबावावा. दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये.लतादीदींच्या स्मारकाच्या वादावर मंगेशकर कुटुंबाची प्रतिक्रिया आली आहे
पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, दीदींच्या स्मारकावरून जो वाद सुरू आहे. तो राजकारण्यांनी थांबावावा. दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये. आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाची स्थापना हीच लतादीदींना खरी श्रद्धांजली आहे. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन लता दीदींना दिले होते. या संदर्भात स्वत: लतादीदींनी सरकारकडे विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही विनंती मान्य करून त्या संदर्भात पूर्वतयारी केलेली आहे. दीदींचे संगीत स्मारक तयार होत आहेत यापेक्षा अन्य कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.
श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते : पंडित हृदयनाथ मंगेशकर
भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे साऱ्या जगताची दीदी हिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे. ही आकाशाएवढी नाही तर अवकाशाऐवढी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा जरी ओतल्या तरी पोकळी कधीही न भरणारी आहे. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर गेल्याने एक संगीत पर्व नाही तर एक युगांत झाला आहे, असे देखील ते म्हणाले
No comments:
Post a Comment