वेध माझा ऑनलाइन - क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, कष्ट आणि प्रतिभा या 3 गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टींच्या जोरावर सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी होता येतं. हे अनेक क्रिकेटपटूंनी दाखवून दिलंय. सर्फराज खान आणि मुशीर खान ही भावंड देखील याचं ताजं उदाहरण आहे. मुशीरची वयाच्या 18 व्या वर्षी मुंबईच्या रणजी टीममध्ये निवड झाली आहे. त्यानं टीम निवडीत सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा सदस्य अर्जुन तेंडुलकरवर मात करण रणजी टीममध्ये जागा मिळवली आहे.
मुशीरचा मोठा भाऊ असलेल्या सर्फराजनं नाव हे भारतीय क्रिकेटला आता नवं नाही. 2016 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्फराजनं टीम इंडियाकडून सर्वात जास्त 355 रन केले. गेल्या काही वर्षांपासून तो रणजी क्रिकेटमध्ये भरपूर रन करत टीम इंडियाचं दार ठोठावत आहेत. तसंच या आयपीएल सिझनमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स टीमचा सदस्य होता.
No comments:
Post a Comment