Tuesday, August 9, 2022

राष्ट्रगीत म्हणत असताना माजी सैनिकाचा खाली कोसळून मृत्यू...

वेध माझा ऑनलाइन - कोणाचा मृत्यू कधी ओढवेल, हे कोणीच सांगू शकत नाही. अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. 'आझादीका अमृत महोत्सव' कार्यक्रमात एका माजी सैनिकाचा मृत्यू ओढवल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यात राष्ट्रगीत म्हणत असताना माजी सैनिक खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रगीत सुरू असतानाच चंद्रभान मालुंजकर हे माजी सैनिक जमिनीवर कोसळले. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रभान मालुंजकर 1962 च्या युद्धात सहभागी झाले होते. नाशिकमधील संदीपगर येथील शाळेत सोमवारी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आझादीका अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. मौले सभागृहात कार्यक्रमावेळी शाळेच्या परिसरात सकाळी 9 वाजता प्रभातफेरी काढण्यात आली होती.
यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना अचानक ते खाली कोसळले. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

No comments:

Post a Comment