Tuesday, August 9, 2022

नितीशकुमार याना आपल्या पक्षाची अवस्था शिवसेनेसारखी व्हायची होती भीती...!

वेध माझा ऑनलाइन - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा भाजपची साथ सोडली आहे. दरम्यान भविष्यामध्ये जेडीयूची अवस्थाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखी व्हायची भीती लक्षात घेऊन नितीश कुमार यांनी, हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
जेडीयूचे माजी नेते आणि केंद्रातले माजी स्टील मंत्री आरसीपी सिंग यांचाही एकनाथ शिंदे यांच्यासारखाच वापर करून जेडीयूची अवस्था शिवसेनेसारखी करण्याचा संशय नितीश कुमार यांना आला. 2020 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने एलजेपीचा वापर करून जेडीयूचं नुकसान केल्याची खात्री नितीश कुमार यांना पटली.त्यामुळे पुढे जाऊन जेडीयूची अवस्थाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखी व्हायची भीती लक्षात घेऊन नितीश कुमार यांनी, हे पाऊल उचालले अशो चर्चा आहे

जेडीयू पक्षातल्याच काही जणांनी आरसीपी सिंग यांना बिहारचा भविष्यातला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायला सुरूवात केली, यामुळेही नितीश कुमार नाराज झाले. अग्नीपथ योजनेला नितीश कुमार यांनी विरोध केला. तसंच जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी केली. एनआरसी तसंच धर्मांतर विरोध कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्यालाही नितीश कुमार यांनी विरोध केला. प्रार्थनास्थळांवरचा लाऊड स्पीकर हा मुद्दा नसल्याचंही ते म्हणाले. तेव्हापासूनच नितीश कुमार वेगळी भूमिका घेणार याचे संकेत मिळायला लागले होते.

महाराष्ट्रातलं बंड होऊन दोन महिने होत नाहीत तोच बिहारमध्ये नितीश कुमारांनी पुन्हा एकदा वेगळी चूल मांडली आहे. महाराष्ट्रात घडलेल्या या राजकीय भुकंपाचे हादरे पटण्यामध्ये बसू नयेत, म्हणून नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून पुन्हा एकदा महागठबंधनचा प्रयोग करणार असल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment