Saturday, September 10, 2022

गणेश विसर्जनासाठी आलेल्या भक्तांसाठी रणजित (नाना) पाटील यांच्यावतीने मोफत जेवणाची सोय ; सकाळी 10 ते पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुमारे 45 ते 50 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ;

वेध माझा ऑनलाइन - येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील (नाना) मित्रपरिवाराच्या वतीने काल अनंत चतुर्थी निमित्त गणपती विसर्जनासाठी आलेल्या सर्व भक्तांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती जवळपास 45 ते 50 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला काल (शुक्रवारी) सकाळी 10 वाजलेपासून पहाटे 3.30 वाजेपर्यंत हा महाप्रसाद भक्तांसाठी सूरु होता  

रणजित (नाना) पाटील हे शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते अत्यंत विश्वासू व जवळचे मानले जातात त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख खूप चढता आहे त्यांनी गेल्या कोविड काळात खूप मोठं काम केलं आहे विशेष म्हणजे त्यानी स्वतः रस्त्यावर उतरून आपले काम शहरासमोर दाखवून देत बांधीलकी जपली आहे  मागील पूरपरिस्थितीत त्यांनी पूरग्रस्तांना जेवण कपडे ब्लॅंकेट औषधे तसेच जीवनावश्यक अनेक गोष्टी मोफत पुरवल्या आहेत केवळ एक दोन गावात नाही तर अनेक पूरग्रस्त भागात गाड्या पाठवून त्यांनी पदरमोड करून ही मदत पुरवली आहे  त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात त्यांच्यामार्फत शहर व तालुक्यातील गणेश मंडळांना  येथील कृष्णा घाट येथे मोफत नाश्ता व जेवणाची सोय करून दिली जाते याहीवर्षी त्यांनी ही सेवा देत आपली बांधीलकी जपली आहे 


काल दिवसभरात सुमारे 45 ते 50 हजार भाविकांनी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने या महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटे 3.30 वाजेपर्यंत ही महाप्रसाद सेवा सुरू होती अशी माहिती स्वतः रणजित पाटील यांनी दिली आहे रणजित पाटील यांची समाजसेवा शहर व परिसरातून नेहमीच सुरू असते  त्यांच्या कार्याचे व दिलदार वृत्तीचे यानिमित्ताने दर्शन झाले आहे त्याच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment