Tuesday, September 6, 2022

श्रीलंकेतील नेते पळून गेले... तसे पवारांना एक दिवस पळून जावं लागणार ; मराठा आरक्षण पवारांना देता आलं नाही ; गोपीचंद पडळकर यांची टीका...

वेध माझा ऑनलाइन - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या बारामती दौऱ्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आज गणपती विसर्जन  आहे. 2024 साली पवारांचे विसर्जन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामतीत आले आहेत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटले, तसेच निर्मला सीतारमन  या बिन टाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणारही नाही, असा टोला पडळकर यांनी लगावला.
दरम्यान, एखाद्याला फसवून लुबाडून घेण्यात बारामतीकरांना फार आनंद असतो. मात्र,  श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे परवारांना एक दिवस पळून जावं लागणार आहे. मराठा आरक्षण यांना देता आलं नाही, असही गोपीचंद पडळकर म्हणाले.

बारामती हा बालेकिल्ला नसून शरद पवारांची टेकडी असल्याचे पडळकर म्हणाले.
मी दोन वर्ष ही टेकडी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते.
माझ्यावर खूप केसेस आहेत. या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा असेही पडळकरांनी कार्यकर्त्यांना म्हटले.
अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत.
एकनाथ शिंदे 50 आमदार घेऊन गेले. फडणवीस यांना सत्तेत बसून द्यायचं नव्हतं.
तरीदेखील ते सत्तेत आले, हे शरद पवारांचे दु:ख असल्याचा टोला पडळकरांनी लगावला.
भाजपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा नेहमीच सन्मान होत असल्याचे पडळकरांनी सांगितले.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत  चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट दिले नव्हते.
आता बावनकुळे हे 288 मतदारसंघात तिकीट वाटप करणार असल्याचे पडळकरांनी सांगितले.



No comments:

Post a Comment