Friday, September 2, 2022

आता काँग्रेसचा गट फुटणार ? शिंदे कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता!

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले भूकंपाचे धक्के अजूनही कायम राहण्याची चिन्हं आहेत. कारण शिवसेनेतील जवळपास 40 आमदार फुटून शिंदे-फडणवीस प्रणित शिवसेना-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर, नव्या घडामोडी घडणार आहेत. शिंदे सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादळ उठण्याची चिन्हं आहेत.

येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज आहे.महाराष्ट्र काँग्रेसमधील खळबळ विधानपरिषद निवडणुकीपासूनच दिसलेली आहे. काँग्रेसमधील काही मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटण्याची चर्चा विधानपरिषद निवडणुकीच्या निकालापासूनच राजकीय वर्तृळात सुरु आहे 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील फाटाफूट समोर आली होती. काँग्रेसची मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील मतं फोडत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची तीन तर सहयोगी अपक्षांची एकूण 12 मतं फुटली. काँग्रेसची 6 मतं फुटल्याने त्यांच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये भाजपला अतिरिक्त 27 मतं मिळाली होती.  
दरम्यान काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अशोक चव्हाण हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अशोक चव्हाण यांनी यावर स्पष्टीकरण देत मी नाराज नाही, काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चा केवळ वावड्या असल्याचं म्हटलं होतं.

No comments:

Post a Comment