वेध माझा ऑनलाइन - आज गणेश विसर्जनानिमित्त येथील सामाजिक कार्यकते रणजित पाटील (नाना) मित्रपरिवाराच्या वतीने गणेश विसर्जनासाठी आलेल्या सर्व भक्तांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे सोबत पिण्याच्या पाण्याची मिनरल वॉटरची बाटली देखील देण्यात येत आहे दरवर्षी युवा नेते रणजित पाटील यांच्याकडून हा उपक्रम राबवला जातो त्यांचे यानिमित्त शहरातून नेहमीच कौतुक होत असत
रणजित (नाना) पाटील हे शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार बाळासाहेब पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू व जवळचे मानले जातात त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख खूप चढता आहे त्यांनी गेल्या कोविड काळात खूप मोठं काम केलं आहे विशेष म्हणजे त्यानी स्वतः रस्त्यावर उतरून आपले काम शहरासमोर दाखवून देत बांधीलकी जपली आहे मागील पूरपरिस्थितीत त्यांनी पूरग्रस्तांना जेवण कपडे ब्लॅंकेट औषधे तसेच जीवनावश्यक अनेक गोष्टी मोफत पुरवल्या आहेत केवळ एक दोन गावात नाही तर अनेक पूरग्रस्त भागात गाड्या पाठवून त्यांनी पदरमोड करून ही मदत पुरवली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात त्यांच्यामार्फत शहर व तालुक्यातील गणेश मंडळांना येथील कृष्णा घाट येथे मोफत नाश्ता व जेवणाची सोय करून दिली जात असते आजही त्यांनी ही सेवा देत आपली बांधीलकी जपली आहे अशा प्रकारे त्यांची समाजसेवा शहर व परिसरातून अखंड सुरूच आहे त्यांच्या कार्याचे शहरातून नेहमीच कौतुक होत असते

No comments:
Post a Comment