Friday, September 9, 2022

बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त हेच भाजपाचं राजकारण ; सामान्यांच्या प्रश्नावर भाजपाचे नेते बोलत नाहीत ; रोहित पवारांची टीका...

वेध माझा ऑनलाइन - भाजपकडून पवार कुटुंबावर निशाणा साधला जात आहे. यावरुन भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अनेकदा जुंपल्याचंही पाहायलं मिळतं. आता पवार फॅमिलीचे सदस्य आणि आमदार रोहित पवार  यांनी भाजपला टोमणेवजा सल्ला दिला आहे. रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. 
दरम्यान बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचं राजकारण केंद्रीत आहे. सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणं, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे

ते म्हणाले की, एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणं ही तितकंच महत्त्वाचं असतं, असं म्हणत रोहित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावला.   जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. मात्र, बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे, असं ते म्हणाले. 
 रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचं राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणं, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत, असं त्यांनी म्हटलं.

No comments:

Post a Comment