वेध माझा ऑनलाइन - आज शहरातील
बहुतांशी घरगुती गणपतीचे विसर्जन होत असते कराड पालिका व पोलीस प्रशासनाने अत्यंत सुंदर पद्धतीने हातात हात घालून आजच्या या विसर्जन विधीसाठी प्रयत्न केल्याचे खासकरून येथील कृष्णा घाटावर दिसून आले...तसेच शहरातील अनेक भागात विसर्जन कुंड ठेवून त्या-त्या परिसरातील लोकांसाठी देखील विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती...
पालिकेचे सी ओ डाके तसेच पोलीस प्रमुख बी आर पाटील या दोघांच्याही टीमचे शहरातील नागरिकांनी याबद्दल खूप अभिनंदन व कौतुक केले आहे... या दोन्ही अधिकाऱ्यांचा अनुभव आजच्या या सर्वच नियोजनातून प्रकर्षाने दिसून आला... दरम्यान दीड हजारहून अधिक गणेशमूर्तीचे आज येथे अतिशय भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले...
आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस... आज बहुतांशी घरगुती गणपती विसर्जित होत असतात त्यानिमित्ताने आज येथील पालिका व पोलिस प्रशासनाने येथील कृष्णा घाट परिसरात विसर्जन विधीसाठी खूपच चांगल्या पद्धतीची सोय करून लोकांची वाहवा मिळवली आहे... त्यासाठी पालिकेचे कर्मचारी गेले 2 आठवडे परिश्रम घेत आहेत...
येथील घाट परिसरात पालिका प्रशासनाने निर्माल्य व गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी विसर्जन कुंडाची व्यवस्था केली होती... जेणेकरून नदीपात्रात निर्माल्य व मूर्ती विसर्जित केल्या न जाता त्यातून पात्र स्वच्छ राहण्यास मदत होईल...
पालिकेने नदीपत्राच्या नजीकच खालच्या बाजूला फोर व्हीलर व टू व्हीलर पार्किंग ची सोय देखील केली होती... आज विसर्जनासाठी येणारे घरगुती व सार्वजनीक मंडळांचे गणपती यांचे विसर्जनमार्ग व ठिकाणे अलग-अलग करण्यात आली होती त्यामुळे त्यासाठी येणारी वाहने आपापल्या नेमलेल्या जागी व्यवस्थित पार्क झालेली पहायला मिळाली...लोकांची व फोर व टू व्हीलर वाहनांची गर्दी असूनही गर्दी जाणवली नाही हेच त्या नियोजनाचे फलित पहायला मिळाले...अतिशय सुटसुटीत पद्धतीने आजचे विसर्जन सर्वांनी अनुभुवले...याचे सगळे क्रेडिट पालिका व पोलीस प्रशासनाला नक्कीच दिले पाहिजे...
दरम्यान, मंडळांच्या विसर्जनासाठी येणार्या मुर्ती खोल पाण्यात जाऊन विसर्जित करण्यासाठी पालिका कर्मचारी तत्पर दिसले... त्यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली होती...
तेथे राबणारे सर्व पोलीस व पालिका कर्मचारी व त्यांची टीम या सर्वांच्या चहा नाश्त्याची सर्वच व्यवस्था घाटावर विसर्जन ठिकाणी केल्याचेही दिसून आले...पालिकेने एवढ्या मोठया व परफेक्ट पद्धतीने केलेले नियोजन शहर वासीयांना खूपच भावले...शहरात या नियोजनाचे सर्वत्र कौतुकही झाले...दरम्यान शहर व परिसरातील सुमारे दीड हजारहून अधिक गणेशमूर्तीचे आज भक्तिमय वातावरणात याठिकाणी विसर्जन करण्यात आले...
कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलीस अधिकारी बी आर पाटील यांच्यासह आरोग्य अभियंता आर डी भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, अभियंता ए आर पवार, अग्निशामकचे साळुंखे, बांधकाम अभियंता मुरलीधर धायगुडे, वरिष्ठ मुकादम मारुती काटरे यांच्यासह कराड शहर पोलीस "स्टाफ' ने देखील आजच्या झालेल्या विसर्जनासाठी विशेष परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment