Friday, September 9, 2022

पंकजा मुंढे यांची नाराजी दूर होणार ! ; निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंढेवर पक्षाची मोठी जबाबदारी;

वेध माझा ऑनलाईन - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी एक यादी जाहीर केली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर विविध राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारीची घोषणा करण्यात आली आहे. यात पंकजा मुंडेंच्याही नावाचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याचं वृत्त वारंवार समोर येत आहे. त्याशिवाय ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा सुरू होत्या.

नड्डा यांनी केलेल्या निवडीनुसार, पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशचा सह प्रभारी करण्यात आलं आहे. तर विजया रहाटकर यांना राजस्थानचा सहप्रभारी करण्यात आलं आहे. भाजपकडून विनोद तावडे यांना बिहार तर प्रकाश जावडेकर यांना केरळ राज्याचा प्रभारी करण्यात आलं आहे.
पंकजा मुंडेंना भाजपने मध्य प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यांना येथील सहप्रभारी करण्यात आलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment