वेध माझा ऑनलाइन - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व 6 दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या दोषींवर अन्य कोणताही खटला नसेल तर त्यांची सुटका करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलं -
सुप्रीम कोर्टाने निर्णयात म्हटले आहे की, राज्यपालांनी बराच काळ त्यावर कारवाई केली नाही, तर आम्ही त्यावर कार्यवाही करत आहोत. या प्रकरणात दोषी ठरलेल्या पेरारिवलनच्या सुटकेचा आदेश उर्वरित दोषींनाही लागू असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिले होते.
या सहा जणांची होणार सुटका -
राजीव गांधी हत्या प्रकरणात नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार, आणि रॉबर्ट पॉयस यांची सुटका करण्याचे आदोश देण्यात आले आहेत. तर पेरारिवलनची आधीच या प्रकरणातून सुटका करण्यात आली आहे. 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन यांच्या तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती एल नागेश्वर यांच्या खंडपीठाने कलम 142 चा वापर करून हा आदेश दिला.
No comments:
Post a Comment