वेध माझा ऑनलाइन - येथील शंभूतीर्थावर स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे साहेब व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खास बाब म्हणून सुमारे 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्टय़पूर्ण योजनेअंतर्गत या निधीचा अध्यादेश पारीत झाला आहे.
या स्मारकासाठी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी स्मारक समितीचे सचिव रणजितनाना पाटील व त्यांचे बंधू व श्री सचिन पाटील तसेच श्री शंभुतीर्थ संवाद यात्रेचे प्रताप इंगवले.सागर आमले.सयाजी थोरात.सचिन वास्के दिपक थोरात सुनील शिंदे सचिन राऊत किरण शिंदे या सदस्यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यास यश आले आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील मंत्री ना उद्य सांमत आ. महेश शिंदे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन झाले आहे. हा निधी कराडकरांच्या भावना लक्षात घेऊन मंजूर केल्याबद्दल मा ना एकनाथरावजी शिंदे याचे कट्टर समर्थक श्री रणजीत नाना पाटील यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या निधीत 90 टक्के हिस्सा राज्य शासनाचा तर 10 टक्के नगरपालिकेची लोकवर्गणी भरण्याची अट आहे.
याबाबत माहिती देताना श्री रणजितनाना पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात ऐतिहासिक कराडच्या भूमीचा इतिहास मोठा आहे. कराडच्या भूमीत त्यांच्या राज्याभिषेकाची बीजे आहेत. याची आठवण म्हणून येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे.या साठी तत्कालीन नगरविकास मंत्री असताना दि 30 जानेवारी 2022 जागा उपलब्ध करुन दिली. हे स्मारक राज्यात भव्य असावे, हा हेतू ठेवून 10 फेब्रुवारी 22 स्वराज्यरक्षक धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करण्यात आली.
समितीची स्थापना झाल्यानंतर नगरपालिकेकडे भेदा चौकातील साईट व्ही जागेची मागणी केली होती. नगरपालिकेने ठराव करून ही जागा स्मारकासाठी दिली. त्यानंतर विविध विभागांकडील परवानग्या, ना हरकत दाखले मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. 16 सप्टेंबर २०२२ रोजी सर्व परवानग्यांची पडताळणी करून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी स्मारकास मंजुरी दिली. हे स्मारक लोकांच्या सहभागा तुन उभारण्याचा संकल्प केला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची 1 नोव्हेंबर 22 दरे या गावी भेट घेऊन त्यांना स्मारकाचे क्ले मॉडेल दाखवत त्यांना भूमिपूजनास येण्याची विनंती केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या संकल्पनेचे स्वागत करत सहकार्याची व 8 कोटी निधी देण्याचा शब्द दिली. त्यानंतर फक्त तेवीस दिवसात मंत्रालयात व मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे अथक पाठपुरावा सचिन पाटील दादा व रणजितनाना पाटील हे समिती सदस्यांना घेऊन करत होते. शेवटी या प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडकरांना दिलेली ही अनोखी भेट आहे. हा निधी मंजूर झाल्याने समिती सदस्यांसह कराडकर नागरिक भारावलेले आहेत. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे समितीतर्फे आभार मानत आहे. लवकरच या स्मारकाच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे.
No comments:
Post a Comment