वेध माझा ऑनलाइन - राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. याच मुद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे. 'शिवरायांचा अवमान हा जातीय राजकारणासाठी केला जात आहे. जातीय राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं जात आहे. या सर्वांची सुरुवात राष्ट्रवादीने केली' अशी टीका राज ठाकरे यांनी केली.शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. शाहू-फुले-आंबेडकर हीच नाव घेतात, शरद पवार महाराजांचं नाव का घेत नाहीत, असा टोलाही राज ठाकरेंनी पवारांना यावेळी लगावला.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
'जातीपातीच्या पलीकडे जाऊन इतिहासाकडे पाहिलं पाहिजे. मात्र सध्या इतिहासाकडे जातीतून पहाण्याचं पेव आहे. शिवरायांचा अवमान हा जातीय राजकारणासाठी केला जात आहे. जातीय राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं जात आहे. या सर्वांची सुरुवात राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादी काँग्रेसने हे जातीय राजकारण सुरू केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
जयसिंगराव पवारांना मी पहिल्यांदा भेटलो नाही. गटबाजीला चाळण लावण महत्त्वांचं आहे. राष्ट्रवादीने हे जातीय राजकारण सुरू केलं आहे. जातीच्या राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं जातं. याची सुरुवात राष्ट्रवादीने केली. मराठा समाज आणि इतर समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जातंय आहे. 1999 पासून हे विष कालावलं जात आहे, अशी टीकाही राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केली.
No comments:
Post a Comment