Thursday, December 1, 2022

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त विधान ; म्हणाले.. राज्यकर्ते हे रेड्याची औलाद ;

वेध माझा ऑनलाइन - रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी  नुकतेच एक वादग्रस्त विधान केले आहे त्यांनी राज्यकर्त्यांची तुलना थेट रेड्यांशी केली आहे. राज्यकर्ते हे रेड्याची औलाद असे वादग्रस्त वक्तव्य खोत यांनी केलं आहे. त्यामुळे, राज्यात सुरु असलेल्या वादात नव्याने भर पडली आहे.

पुण्यात एका कार्यक्रमात आपल्या जाहीर भाषणात सदाभाऊ यांची जीभ घसरली. राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत असं विधान सदाभाऊ खोत यांनी केले.


No comments:

Post a Comment