Tuesday, July 4, 2023

समान नागरी कायद्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा ; काय म्हणाले ठाकरे?

वेध माझा ऑनलाईन। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक पार पडली. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. समान नागरी कायद्याला पाठिंबा असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर ठाकरे गटाच्या सर्व आमदार खासदार उपनेत्यांची बैठक बोलावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर या बैठकीत ठाकरे गटांच्या नेत्यांकडून राज्यातील विविध मतदार संघांमध्ये याचा नेमका काय परिणाम होणार? या संदर्भात आढावा घेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली

समान नागरी कायद्यासंदर्भात ठाकरेंच्या या बैठकीत चर्चा झाली. या कायद्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत मसुदा या कायद्यासंदर्भात समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे किंवा भूमिका योग्य नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. 

उद्धव ठाकरे हे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. सर्व नेत्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर महाविकास आघाडीमध्ये राहायचे की नाही? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी या बैठकीत आमदार खासदार आणि इतर नेत्यांची मते जाणून घेऊन आपण यापुढे महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचा निर्णय ठाकरे गटाकडून या बैठकीत घेण्यात आला.

No comments:

Post a Comment