Sunday, August 13, 2023

वाचन चळवळीने शेकडो विद्यार्थ्यांना विचारांचे संस्कार दिले ; माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या " वाचन चळवळ ' उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक आणि गौरवोद्गार ;

वेध माझा ऑनलाइन। नव्या पिढीच्या विचारांना मोबाईलसह सोशल मीडियाचा विळखा पडला आहे. यातून नव्या पिढीला विचारांचे संस्कार देण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण वाचन चळवळीचा उपक्रम माजी नगरसेवक सौरभ पाटील मित्र परिवार यांच्या पुढाकाराने सुरू झाला. कराड नगरपरिषद ग्रंथालयाच्या मदतीने लाखो पुस्तकांच्या सहवासात सुरू असलेल्या वाचन चळवळीने शेकडो विद्यार्थ्यांना सामाजिक विचारांचे संस्कार दिले, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.  

स्व. वेणुताई चव्हाण स्मारक येथे आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण वाचन चळवळ उत्कृष्ट वाचक व गुणवंत विद्यार्थी  पुरस्कार सोहळय़ाप्रसंगी मान्यवरांनी हे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमास प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अनिल लाहोटी, माजी नगराध्यक्षा ऍड. विद्याराणी साळुंखे, कराड मर्चंट बँकेच्या अध्यक्षा कविता संदीप पवार, कोमल कुंदप, डॉ. रचना थोरात, उद्योजक संदीप कोटणीस, ज्योती बेडेकर, डॉ. शोभा देसाई, सौ. सीमा पुरोहित, राहुल पुरोहित, ग्रंथपाल संजय शिंदे यांच्यासह निमंत्रक माजी नगरसेवक सौरभ पाटील, डॉ तेजस्वी  पाटील यांची उपस्थिती होती.  

पुस्तक वाचनासह बालकांना दिल्या जाणाऱया मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम याची माहिती डॉ. लाहोटी यांनी दिली.  रिल्स अन् सेल्फीच्या जमान्यात पुस्तक पुस्तकांची बागेत विद्यार्थी रमतात ही मोठी चळवळ आहे. पुस्तकांची बाग नव्या पिढीत ऊर्जा निर्माण करत असून ती यापुढेही बहरत रहावी अशा सदिच्छा कविता पवार यांनी व्यक्त केल्या. कोमल कुंदप यांनी वाचनाची आवड ही सृष्टीला दृष्टी देणारी असते असे सांगितले. सौरभ पाटील यांनी प्रास्ताविक करताना हा उपक्रम स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार जोपासण्यासाठी आणि नव्या पिढीला विचारांचे संस्कार देण्यासाठी सुरू केला असल्याचे सांगितले. या उपक्रमातून लाखो पुस्तकांचा खजिना विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथपाल संजय शिंदे व त्यांच्या सहकाऱयांचा सत्कार करण्यात आला. सतीश भोंगाळे यांनी आभार मानले.  शिल्पा शहा, सीमा पुरोहित यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले.

सत्काराने पालक भारावले!
कराडला पुस्तकांच्या बागेत सातत्याने येऊन वेगवेगळी पुस्तके वाचणाऱया विद्यार्थ्यांसह पालकांचा याप्रसंगी पारितोषिक देऊन सत्कार झाला. तसेच विविध शाळांत वेगवेगळय़ा कला, क्रीडा, वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचाही सत्कार झाला. आपुलकीच्या सत्काराने पालक भारावून गेले.

 वाचक विजेते...
प्रथम क्रमांक - शौनक मंगेश विदार, राजवीर विश्वजित भुंजे.
द्वितीय क्रमांक - वरद सतीश भोसले,
तृतीय क्रमांक - जमुना मणिराम भंडारी.

पुस्तकांची बाग -
प्रथम क्रमांक - श्रुती संदीप आजेठराव, द्वितीय क्रमांक - श्रीधर बाबासो नावडकर,तृतीय क्रमांक - इंदिरा सुधाकर गायकवाड, उत्तेजनार्थ क्रमांक - मुग्धा धीरज जगताप, अन्वयी शैलेश कणसे, प्रभास राहुल पुरोहित.

No comments:

Post a Comment