Friday, October 4, 2024

उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर ; डॉ. अतुल भोसले यांचे प्रयत्न;


वेध माझा ऑनलाइन।
कराड दक्षिणमधील विविध विकासकामांसाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, या माध्यमातून कराड दक्षिणमधील १२ गावांमध्ये विविध प्रकारची विकासकामे साकारली जाणार आहेत
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून विकासकामे मंजूर करावीत, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे केली होती. त्यानुसार खासदार भोसले यांनी १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे

No comments:

Post a Comment