वेध माझा ऑनलाइन
पुणे - चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण येथे रहात्या घरात आई सोबत झोपलेल्या 4 वर्षीय भाच्चीला झोपत उचलून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करण्यात आलाय. सख्ख्या मामानेच अत्याचार केल्याने संताप व्यक्त होतोय. मनिषकुमार सिंग असे अत्याचार करणा-या मामाचे नाव आहे. पीडित मुलीचे कुटुंब बिहार येथील रहिवाशी आहेत. पीडित मुलीचे वडिल एका खासगी कंपनीत कामाला गेले असताना घरात झोपलेल्या 4 वर्षीय मुलीला तिच्या मामाने उठवून घराबाहेर निर्जनस्थळी नेले. जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करुन तिकडेच सोडुन दिलं. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केलीय.
No comments:
Post a Comment