Saturday, February 29, 2020

अतिक्रमण कारवाई करताना यापुढे दुकानचे बोर्ड काढणार नाही - यशवंत डांगे यांनी हा निर्णय तात्पुरता असल्याचं सांगितलं...कारवाईची पद्धत चुकीची असल्याच्या व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया...

कराड
गेले तीन दिवसांपासून सुरू असणारी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम ही यापुढे ही अशीच चालू राहणार आहे. शहरातील व्यापाऱ्यांबरोबर या मोहिमे संदर्भात झालेल्या मीटिंग मधून व्यापाऱ्यांची सकारात्मक भूमिका समोर आली .ही मोहीम अशीच चालू ठेवा असे या व्यापाऱ्यांनि यावेळी सांगितले.ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या नुकसान भरपायीबद्दल हे व्यापारी रीतसर मागणी करणार आहेत मात्र या पुढे ही कारवाई होताना दुकानचे बोर्ड न काढण्याबाबत तात्पुरता निर्णय झाला असल्याचे कराड पालिकेचे c o यशवंत डांगे यांनी आज येथे सांगितले.दरम्यान ही  कारवाई  कौतुकास्पद आहे मात्र ती राबवण्याची पद्धत चुकीची असल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने दिल्या आहेत.

आज येथील व्यापारी पेठेतील अतिक्रमणे काढण्यात आली.त्यावेळी काही दुकानदारांच्या दुकानाच्या नावाच्या पाट्या असणाऱ्या बोर्डाचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी येथील काही व्यापाऱ्यांनि केल्या.काहींचे बोर्ड 20 ते 30 हजाराचे होते.तर काहींचे 50 हजार व त्याच्याही पेक्षा महाग होते अस सांगण्यात आले.त्या नुकसान भरपाईची व्यवस्था काय?हा प्रश्न या व्यापाऱ्यांना होता.त्या कारणाने नाराज होत या सर्व व्यापाऱ्यांनि आज प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला.त्यावेळी झालेल्या प्रशासनाबरोबरच्या मीटिंग मध्ये या विषयावर चर्चेतून पडदा पडला असे समजले.त्यामुळे ही मोहीम या पुढे अशीच चालू ठेवण्या बाबत व्यापाऱ्यांनि संमती दर्शवली असेही समजते.


गेली तीन दिवस सुरू असणारी ही मोहीम आता संभाजी मार्केट, पोपटभाई पेट्रोल पम्प, भेदा चौक या ठिकाणी आता आम्ही हाती घेतोय.आत्ता पर्यंत झालेली मोहीम व्यवस्थित पार पडली .शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याच टार्गेट ठेऊन आमची यापुढची  मोहीम शहरातून पार पडणारआहे असेही डांगे यांनी यावेळी सांगितले.दरम्यान ही चालू असलेली कारवाई कौतुकास्पद आहे,मात्र ती राबवण्याची पद्धत चुकीची असल्याच्या प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिल्या.



.

Wednesday, February 26, 2020

कराड नगराध्यक्षांच्या पालिकेतील केबिनला कुलूप घातले प्रकरणी "प्रहार' च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल......

कराड
येथील नगराध्यक्षांच्या पालिकेतील केबिनला कुलूप घालणाऱ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेत नगराध्यक्षा हजर नसल्याच्या कारणावरून सदर संघटनेने त्यांच्या केबिनला कुलूप घालून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे,या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला.प्रहार संघटना यापुढचे काय पाऊल उचलते हे आता पहायचे आहे.

प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येथील नगराध्यक्षांना भेटून त्यांना शहरातील काही समस्यांबाबतचे निवेदन देण्याकरता मंगळवार दि.25 रोजी पालिकेत आले असता नगराध्यक्षा पालिकेतच हजर नव्हत्या.त्या पक्षाच्या कामाकरिता बाहेर गेल्या असल्याच या संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजले.त्यानंतर त्यांनी त्यांच्या पालिकेतील केबिनला कुलूप घातलं व नगराध्यक्षांना लोकांची कामे करायची नसतील तर त्यांनी राजीनामा देउन घरी बसावं व पक्षच काम खुशाल करावं असा पवित्रही घेतला होता.त्यानंतर पालिकेच्या वतीने या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांवर येथील पोलीस ठाण्यात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल,तसेच आणि इतरही काही कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे आता,यापुढचे पाऊल प्रहार  संघटना काय उचलणार हे आता पहायचे आहे.


Tuesday, February 25, 2020

रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी डॉ. अतुलबाबांकडून आर्थिक मदत...

कराड
स्वराज्या साठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या वंशजांना मदत करण्याकरिता समाज्यातील प्रत्येक घटक पुढे आला पाहिजे.ते आपणा सर्वांचे कर्तव्यच आहे असे प्रतिपादन कराड दक्षिण चे भाजप नेते अतुलबाबा भोसले यांनी केले.नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी शेतकरी प्रसारक मंडळाकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत डॉ. शितलताई मालुसरे यांच्याकडे अतुलबाबा यांचेकडून  सुपूर्द करण्यात आली त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना अतुलबाबा म्हणाले, डॉ शीतल मोरे यांच्या पाठीशी त्यांचा एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहणार आहोत.छत्रपतींचे विचार, कार्य नव्या पिढीसमोर यावे व त्यातून चांगला समाज घडण्यासाठी मदत व्हावी, या पिढीला त्यांचे विचार समजावेत यासाठी म्हणून शिवमहोत्सव आयोजित करण्यात आला होता.या पुढे हा महोत्सव व्यापक स्वरूपात साजरा होईल अशी ग्वाही ही भोसले यांनी यावेळी दिली.

डॉ. शितलताई मालुसरे यावेळी म्हणाल्या, स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या वंशजांना अतुलबाबा भोसले यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली आहे त्यामुळे आपण या ऋणातच राहणे पसंत करू.

 यावेळी,शेतकरी प्रसारक मंडळाचे प्रमुख सल्लागार प्रा. विनोद बाबर,इतिहास अभ्यासक प्रा अरुण घोडके,शिवकालीन शस्त्र संग्रहक गिरिश् राव जाधव,डॉ.बी एस साळुंखे, एस ए माशाळकर, डॉ.उदयसिंह सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 जुळेवाडी तालुका कराड येथील जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट याठिकाणी  छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सदर शिवमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

कराडच्या नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदें यांच्या पालिकेतील केबिनला प्रहार संघटनेने ठोकले टाळे...

कराड
येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कराडच्या नगराध्यक्षा रोहिनीताई शिंदे यांच्या येथील पालिकेतील केबिनला टाळे ठोकल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. नगराध्यक्षा जनतेच्या कामांना महत्व देत नाहीत असा ठपका ठेवत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील नगराध्यक्षा शिंदे यांच्या येथील पालिका केबिनला चक्क टाळे ठोकून त्यांना लोकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावे असा संतप्त पवित्रा घेतला.

आज सकाळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येथील नगराध्यक्षाना निवेदन देण्यासाठी पालिकेत आले होते.त्यावेळी अध्यक्ष पालिकेत नाहीत,तर भाजप पक्षाच्या कार्यक्रमात गेल्या असल्याचं सांगण्यात आलं.त्यांच्या कडून लवकर येण्याबाबत टाळाटाळ होत गेल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या पालिकेतील कार्यालयास चक्क टाळे ठोकले.
प्रहार संघटनेच्या वतीने, शहरातील विविध भागांतील तसेच वाखान परिसरातील महत्वाच्या समस्यां सोडवण्यात याव्यात या साठी नगराध्यक्षा सौ. शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांना त्याबाबतचे निवेदन देण्याच्या करिता म्हणून हे सर्व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येथील पालिकेत सकाळी 11 वाजणेचे सुमारास आले होते. मात्र,भाजपा च्या वतीने आज येथील तहसील कार्यालयासमोर सध्याच्या राज्यसरकरच्या विरोधात शेतकऱ्यांवर सुरू असणाऱ्या फसवणुकीविरोधात व महिलांच्या अत्याचारात वाढ होत असल्याच्या कारणाने धरणे आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी म्हणून नगराध्यक्षा सकाळ पासून भाजप च्या सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होत्या,
त्यामुळे त्या पालिकेत आल्या नसल्याचं सांगण्यात आलं.त्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 11 ते 1 वाजे पर्यंत वाट पाहून चक्क नगराध्यक्षांच्या येथील पालिकेतील केबिनलाच टाळे ठोकून नगराध्यक्षाना जर शहरातील समस्यांची सोडवणूक करण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन पक्षाचे काम करावे व घरी बसावे असा इशाराही  संघटनेच्या वतीने या वेळी देण्यात आला.






Saturday, February 22, 2020

अतुलबाबांना अद्यापही जाणवते आहे पराभवाची सल.???

कराड(अजिंक्य गोवेकर यांजकडून)
सध्याच्या राज्यातील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या महाविकास आघाडीच्या विरोधात येत्या 25 तारखेला मंगळवारी म्हणजे आज सातारा जिल्ह्यातील भाजप या सरकारचा निषेध करत धरणे आंदोलन करणार आहे.या सरकारने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार या बाबत हे सरकार कुचकामी ठरत आहे असा आरोप करत या आंदोलनाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली व  याविषयी विस्तृत माहिती दिली.यावेळी उपस्थित असलेले डॉ, अतुल भोसले खूप वेळ शांत होते...मात्र या आंदोलनाबाबत माहिती देऊन झाल्यावर येथील इतर प्रश्नांवर पत्रकार या नेत्यांशी चर्चा करू लागले त्यावेळी मागील झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्याना भरपाई अद्याप मिळाली नाही.त्यावेळी तुमचेच सरकार होते असा सवाल पत्रकारांनी पावसकर व अतुलबाबाना विचारला असता,पावसकरनी, घाटावरील रहिवासी असलेल्या पूरग्रस्तांना, व कुंभार समाज्यातील लोकांना ही मदत पोचल्याच सांगितल.त्यावेळी पाटण कॉलनीतील पूरग्रस्तांना काहीच मदत का दिली गेली नाही...असा सवाल केला असता...मधेच डॉ. अतुलबाबा म्हणाले...त्या ठिकाणी जे पुढारी राहतात त्यांनाच हा प्रश्न विचारा... ते सत्तेत आहेत...आता हे त्याना विचारा...असे ते बोलताच त्या ठिकाणी एकच हशा पिकला... या त्यांच्या दिलेल्या उत्तरातून अतुलबाबाना त्यांचा थोडक्या मतात  झालेला पराभव अद्याप सलतोय असच जाणवलं...नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून कराड दक्षिण मधून आ.पृथ्वीराज बाबा यांच्या विरोधात किरकोळ मतांच्या फरकाने अतुलबाबा पराभूत झाले.शहरातील प्रमुख ताकदी त्यांच्या बरोबर होत्या.जबरदस्त फाईट त्यांनी पृथ्वीराज बाबांना दिली.पण,थोडक्यात ते पराभूत झाले.त्या नंतर काही दिवस ते out off
होते. नंतर ते कराड जवळील गोटे येथील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदतीला पुढे आलेले मतदार संघाने झालेल्या निवडणुकीनंतर पाहिले.आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने ते यावेळी आले असता, जिल्हाध्यक्षांनि आंदोलनाबाबत माहिती देऊन झाल्यावर इतर प्रश्नावर उपस्थित पत्रकार या भाजप नेत्यांशी बोलू लागले त्यावेळी पाटण कॉलनीतील रहिवासीना गेल्या पावसाळ्यात झालेल्या नुकसानाची भरपाई पूरग्रस्त म्हणून मिळाली नाही याबाबत विचारणा केली असता अतुलबाबानी अक्षरशः पोटतिडकीने आपले म्हणणे मांडले व निवडून आलेल्याना ह्याचा जाब विचारा असे ते म्हणाले.त्यांनी अशा त्यावेळच्या सडेतोड व पोटतिडकीने केलेल्या या वक्तव्यावरून त्यांना त्यांच्या झालेल्या  पराभवाची सल आजही तेवढीच जाणवते आहे हे मात्र या निमित्ताने आवर्जून लक्षात आले...
खरतर,अनेकांचे झालेले विजय गाजतात मात्र अतुल बाबांचा पराभव अनेक चर्चानि गाजला होता.त्यामुळे खरे सेलिब्रेटी निवडणुकीनंतर अतुलबाबाच ठरले. ते निवडून येणार म्हणून लागलेल्या सर्वाधिक जिल्ह्यातील पैजा त्यांची लोकप्रियता अधोरेखित करणाऱ्या ठरल्या. त्यांच्याच बाजूला तालुक्याचे अनेक नेते,नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते यांचा ओढा का होता ? यावरून देखील त्यांच्या वाढत्या ताकदीची चर्चा त्यावेळी झाली. पराभूत होऊनही त्यांची निवडणुकीतून प्रचंड वाढलेली मते हीदेखील त्यांना लोकप्रियता मिळवून देणारी चर्चा ठरली. राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेले युवा नेतृत्व म्हणून संपूर्ण दक्षिण मतदार संघ त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत होता.त्यांनी पंढरपूर देवस्थान येथे केलेला विकास राज्यात चर्चेचा ठरला.येथील पालिकेत त्यांचा शब्द कराड शहाराच्या विकासात त्यांचं नेतृत्व फुलवत चालला होता. त्याचवेळी झालेल्या निवडणुकीदरम्यान जाहीर सभांमधून त्यांच्यावर कळत, न कळत झालेली राजकीय शाळा  त्यांच्या पराभवाच कारण लोकांना वाटू लागली, अनेक राजकारण्यांनी आपली निष्क्रियता लपवण्यासाठी या चर्चेचे भांडवलदेखील केले.याचीही जोरदार चर्चा झाली...
एकूणच... अतुलबाबा निवडून येणार असा अंदाज काही मिडियानेही वर्तवला, मात्र तस झालं नाही......तरी  अतुलबाबा अनेक चर्चानी गाजले... आणि जणू सेलिब्रेटी ठरले...
 याच आपल्या वाढत्या लोकप्रियतेची कल्पना त्यांनाही असावी ...म्हणूनच कदाचित त्यांना या झालेल्या पत्रकारपरिषदेदरम्यान आपल्या पराभवाची सल जाणवली असावी...
आणि ती त्यांच्या बोलण्यातून दिसलीदेखील...यानिमित्ताने ते
आता पुन्हा नव्याने चर्चेत आले आहेत...