Saturday, February 27, 2021

98 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; 117 जण सापडले नवे रुग्ण...

ललसातारा दि.27 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 98  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 494 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
494  जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 130, कोरेगाव येथील 22, वाई येथील 27, खंडाळा येथील 10, रायगाव येथील 35, पानमळेवाडी येथील 52, महाबळेश्वर येथील 15, दहिवडी येथील 55, म्हसवड येथील 39, व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 39 असे एकुण 494 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान 117 नवे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असल्याचे रिपोर्ट्स आले आहेत
याबाबतची सविस्तर बातमी उद्या...
--------------------------------------------
*एकूण नमुने - 345788*
*एकूण बाधित - 58686*  
*घरी सोडण्यात आलेले -55698*  
*मृत्यू- 1852* 
*उपचारार्थ रुग्ण- 1136*

No comments:

Post a Comment