वेध माझा ऑनलाइन
कराड
कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. भारतात देखील गेल्या काही दिवसांपासून सतर्कता बाळगण्यात आलं आहे. तरीही अखेर देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचे 2 रुग्ण सापडले आहेत. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे
कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान दोन्ही रुग्णांचे वय हे अनुक्रमे 66 आणि 46 वर्षे आहे. कर्नाटक हे महाराष्ट्र ला शेजारील राज्य असल्याने राज्याला ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
दरम्यान, आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमिक्रॉन वेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटली आहे आणि WHO ने त्यांना व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीमध्ये ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेत प्रथम या व्हेरीएन्टची लागण झाली होती
No comments:
Post a Comment