Friday, December 3, 2021

जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळावं, शिवेंद्रराजेंची शरद पवारांसमोर इच्छा, सूत्रांची माहिती

वेध माझा ऑनलाइन
सातारा
राज्यात नुकत्याच पहिल्या टप्प्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांचा टप्पा पार पडलाय. सध्या अध्यक्ष निवडींचा कार्यक्रम सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या जिल्हा बँकेतील पराभवामुळं सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची  राज्यात सर्वाधिक चर्चा झाली होती. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्हा बँकेत सगळ्यांना सर्वांना सोबत घेऊन कारभार केला असल्यानं अध्यक्षपद मिळावं,अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवल्याची माहिती आहे. तर, शरद पवारांनी देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी ज्या पद्धतीनं बँकेचे चेअरमन म्हणून काम केलं त्याबद्दल कौतुक केलं असल्याची माहिती आहे.

साता-याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्या भेटीत जिल्हा बँक अध्यक्ष पदाबाबत चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे.

शरद पवार यांनी त्या भेटीमध्ये शिवेंद्रराजे यांचं कौतुक केल्याची माहिती आहे. शिवेंद्रराजे आपण बँक उत्तम चालविली आहे अगदी भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत आपण काम करताय या शब्दांत शिवेंद्रराजे भोसले यांची शरद पवार यांनी स्तुती केली असल्याची माहिती आहे शिवेंद्रराजे भोसले यांनी बँकेत राजकारण नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केल्याचं शरद पवार यांना संगितलं. यावेळी ही अध्यक्षपद मिळावं अशी इच्छा त्यांनी बोलुन दाखवली असल्याची माहिती आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांचं पारड जड

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. जिल्हा बँकेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मानणाऱ्या संचालकांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस सहकारात पक्षीय राजकारण नको या मुद्यावर शिवेंद्रराजे भोसले यांना पुन्हा एकदा चेअरमन पदाची संधी देऊ शकते.

No comments:

Post a Comment