कराड
देशात लसीकरणानं नवा उच्चांक स्थापित केला आहे. देशातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या निम्म्या लोकसंख्येला कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. भारत सरकारनं ही माहिती दिली आहे. आतापर्यंत देशामध्ये देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 127.61 कोटी हुन अधिक अँटी-कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत.कोराना विरुद्धच्या युद्धात भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. देशातील पात्र लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
भारतात सध्या जेवढे सक्रिय कोरोना रुग्ण आहेत त्या रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या 1 टक्क्यांहून कमी आहे सध्या हे प्रमाण 0.29 टक्के आहे जे मार्च 2020 पासून सर्वात कमी आहेत. देशात आजपर्यंत एकूण 64.72 कोटीहुन अधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment