Saturday, December 4, 2021

ऍड. संभाजीराव मोहिते यांचे पर्यावरणाचे रक्षक व नागरिक या विषयांवर टाऊन हॉल येथे व्याख्यान... माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कृष्णाकाठ सप्ताहाचे कराड पालिकेच्या वतीने आयोजन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड नगरपरिषद आणि समर्थ भारत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ३ दिवसीय " कृष्णाकाठ सप्ताह २०२१ " चे  आयोजन स्व यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन हॉल येथे करण्यात आले आहे.आज या सप्ताहाच्या दुसऱ्यादिवशी व्याख्याते  ऍड. संभाजीराव मोहिते यांचे पर्यावरणाचे रक्षक / नागरिक या विषयांवर व्याख्यान पार पडले. 

ऍड.संभाजीराव मोहिते यावेळी म्हणाले पर्यावरणाचे रक्षण महत्त्वाचे आहे त्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे व त्यासाठीच्या  उपाययोजना करणे गरजेचे आहे पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती महत्वाची आहे.कराड शहरात कृष्णा कोयना नदी पात्रांची स्वच्छता ठेवणे,त्यासाठी स्वच्छता शिबिराचे आयोजन करणे जेणेकरून नदीपात्रालगत घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. आदरणीय स्व पी डी पाटील साहेबांच्या संकल्पनेतून उभारलेल्या देशातील पहिल्या " भुयारी गटार योजना " व  " मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र " या दोन योजनांची माहिती देत साहेबांनी त्यावेळेस घेतलेल्या या दोन्ही विकासाभिमुख निर्णयामुळे कराड शहर आजही स्वच्छ आणि सुंदर राहिले असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी नगरसेवक सौरभ अशोकराव पाटील एन्व्हयरो नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद, वृक्षमित्र  चंदू जाधव पौर्णिमा जाधव राजाभाऊ लाटकर  अरुण काकडे श्री बाळ देवधर साहेब विजय दिवस समारोह समितीचे प्रा  बी एस खोत  रमेश पवार विलासराव जाधव (काका), मानसी जाधव  समर्थ भारत परीवारचे   प्रणय सपकाळ, सुयोग शिंदे,  अथर्व खामकर व पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment